घरमुंबईगणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या

Subscribe

ठाण्यात वाजतगाजत 37,361 मूर्तीचे विसर्जन

गुरुवारी ठाण्यात गणेशभक्तांनी ढोलताशाच्या गजरात दीड दिवसाचे, सात दिवस,आणि दहा दिवसाच्या 37 हजार 361 गणेशमूर्तींचे विसर्जन विविध विसर्जन घाटात करण्यात आले. गणेशभक्तांच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा आणि महापालिका प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांनी पालिकेच्या उपलब्ध करून दिलेल्या सुविधेला प्रतिसाद दिल्याने महापौर मीनाक्षी शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गणेशभक्तांचे आभार व्यक्त केले.
अनंतचर्तुदशी दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर घरगुती व सार्वजनिक असे एकूण 6190 गणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. यात घरगुती 5574 गणेशमूर्ती, 482 सार्वजनिक गणेशमूर्ती व 36 गौरीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 98 गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले.

कसार्‍यातील मुंबई नाशिक महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या बंधारा आणि वाशाळा मार्गावरील लहान तलावात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन शांततेत करण्यात आले. सकाळी अकरा वाजतापासूनच येथे श्रीच्या विसर्जनाला सुरूवात झाली. शिवाजी चौकात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांची रांग लागली होती.

- Advertisement -

प्रभागातील विविध भागातून तानाजीनगर चौकात एकत्र आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक मुख्यबाजारपेठ व वाशाळा रस्त्यावरून विसर्जन गणेश घाटाकडे जात होती. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकुण 487 सार्वजनिक व 7295 घरगुती अशा एकूण 7782 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -