घरताज्या घडामोडीइम्तियाज जलील यांचं शरद पवारांना आव्हान!

इम्तियाज जलील यांचं शरद पवारांना आव्हान!

Subscribe

इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच थेट आव्हान दिलं आहे.

लोकसभा निवडणुकांवेळी औरंगाबादमध्ये एमआयएमचा चेहरा असलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील संसदेत खासदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यावेळी त्यांनी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तीनही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. प्रस्थापित पक्षांमध्ये मुस्लीम नेतृत्वाला संधी दिली जात नाही, असा दावा एमआयएम आणि पक्षाच्या नेत्यांकडून नेहमीच केला जातो. तसाच एक दावा करत आता इम्तियाज जलील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच आव्हान दिलं आहे. ‘शरद पवारांनी मुस्लीम आमदाराला निवडून आणून दाखवावं. ज्या दिवशी ते मनात घेतील, त्या दिवशी ते निवडून आणू शकतील. पण ते तसं करत नाहीत. त्यांनी तसं केलं, तर त्यांच्या उमेदवाराचं आव्हान स्वीकारायला मी तयार आहे’, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.

यावेळी बोलताना जलील म्हणाले, ‘इतर कोणत्याही पक्षामध्ये मुस्लीम नेतृत्वाला वर येऊ दिलं जात नाही. अब्दुल सत्तार देखील पक्षाच्या जिवावर नसून स्वत:च्या क्षमतेवर निवडून येतात. त्यामुळे शरद पवारांनी मुस्लीम नेतृत्वाला निवडून आणून दाखवावं.’

- Advertisement -

‘अनुराग ठाकुरांवर काय कारवाई केली?’

दरम्यान, यावेळी इम्तियाज जलील यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर देखील भूमिका मांडली. ‘केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर जेव्हा म्हणतात, ‘देश के गद्दारो को गोली मारो सालों को’, परवेश शर्मा म्हणतात ‘शाहीन बागमधले आंदोलक घरात घुसून बलात्कार करतील’, योगी आदित्यनाथ म्हणतात ‘बोली से नहीं मानेंगे, तो गोलीसे मानेंगे’, तेव्हा त्यांच्यावर कुणी कारवाई का केली नाही? कर्नाटकमधलेच रेड्डी नावाचे आमदार होते, आता ते मंत्री आहेत. ते म्हणाले होते की ‘आम्ही ८० कोटी आहेत. तुम्ही १७ कोटी आहात. तुम्ही जास्त माजलात, आम्ही चालून आलो तर तुम्हाला देशातून बाहेर काढून टाकू’. त्यांच्यावर काय कारवाई केली?’ असा देखील सवाल जलील यांनी उपस्थित केला.


हेही वाचा – MIM खासदार इम्तियाज जलील, NCP उमेदवार कदीर मौलाना यांच्यात हाणामारी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -