घरमुंबईकुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांचे स्मारक वर्षभरात उभं राहणार - देवेंद्र फडणवीस

कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांचे स्मारक वर्षभरात उभं राहणार – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबई : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, इंदु मिलच्या जागेवर पुढच्या वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये स्मारक उभ राहणार. मुख्यमंत्र्या स्वत: या स्मारकाकडे लक्ष देत आहेत. त्यांनी आपल्या वॉर्डरूममध्ये या स्मारकांची प्रतिकृती ठेवलेले आहे आणि ते दर 15 दिवसांनी या स्मारकाची काय परिस्थिती आहे यासंदर्भातला अहवाल प्राप्त करत असतात.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना इंदु मिलच्या जागेचा प्रश्न आपण सोडवू शकलो. या गोष्टीचं मला समाधान आहे.  पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ ती जागा आपल्याला दिली. तिथले काम आपण सुरू केले आहे. मध्यतंरी कोविडमुळे कामाची गती झाली होती, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: जाऊन आढावा घेतला आणि त्या ठिकाणी ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या असून आता अत्यंत वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात आम्ही बैठक बोलवू आणि त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

ते म्हणाले की, पुढच्या वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे स्मारक उभ करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. या स्मारकाचे वेगाने काम व्हावे यासाठी मुख्यमंत्री स्वत: या स्मारकाकडे लक्ष देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या वॉर्डरूममध्ये या स्मारकांची प्रतिकृती ठेवलेली आहे आणि दर 15 दिवसांनी ते या स्मारकाची काय परिस्थिती आहे यासंदर्भातला अहवाल प्राप्त करत असतात. त्यामुळे मला विश्वास आहे की, जगाच्या पाठीवर हेवा वाटावा असे हे स्मारक उभ राहणार आहे. मुंबईमध्ये कोणीही आलं तरी त्याला बाबासाहेबांचे दर्शन घेऊनच पुढे जावे लागेल, अशा प्रकारची रचना असलेले हे स्मारक या ठिकाणी तयार होत आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

आमच्या सरकारने बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेतले
फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये ज्या ठिकाणी शिक्षण घेतले. त्या घराचा लिलाव होत असताना महाराष्ट्र सरकारने आम्हाल हे घर घ्यायच आहे हे सांगितल्याचा मला आनंद आहे. केंद्र सरकारने आम्हाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था करून दिली आणि महाराष्ट्र सरकारने ते घर विकत घेतले असून या घरामध्ये संग्रहालय सुरू केल आहे. हे घर विकत घेतल्यानंतर काही अडचणी आल्या होत्या, पण सिटी काउंसिलची केस आपण जिंकल्यानंतर या संग्रहालयाला अधिकृत मान्यता मिळाली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी संग्रहालयात गेलो तेव्हा त्या ठिकाणी अनेक दुर्मिळ पेंटिंग आणि पत्र होते. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, बाबासाहेबांना अनेक भाषा ज्ञात होत्या. त्याचे जर्मन भाषेत लिहिलेले पत्र त्या ठिकाणी आहे. अशा या महामानवाच्या दीक्षाभूमीमध्ये मागच्या काळात मोठ्या प्रमाणात काम केली आहेत आणि आताही 100 कोटी रुपये देऊन काम करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -