घरमुंबईगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी खरेदीत वाढ

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी खरेदीत वाढ

Subscribe

यंदाच्या वर्षी दुचाकीकडे ग्राहकांची पाठ

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांचा नवीन वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. यावर्षीही मुंबईमध्ये मोठ्या संख्येने वाहन खरेदी करण्यात आली आहे, परंतु यामध्ये चारचाकी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल अधिक होता. तर दुचाकी वाहनांची गतवर्षीच्या तुलनेत फारच कमी खरेदी करण्यात आली. त्यामुळे या वर्षीचा गुढीपाडवा हा चारचाकी गाड्यांच्या कंपन्यांसाठी फायदेशीर तर दुचाकी वाहनांच्या कंपन्यांसाठी फारसा दिलासा देणारा नव्हता.

गुढीपाडव्याच्या दिवशी गाडी, सोने किंवा नवीन वास्तू खरेदी करण्याकडे अधिक कल असतो. मात्र, यावर्षी वाहन खरेदीमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. असे असले तरी त्याचा सरकारच्या महसुलावर परिणाम झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहनांच्या खरेदीत 13 टक्के घट झाली असताना महसुलात मात्र 68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल कमी असला तरी चारचाकी खरेदीकडे गतवर्षीच्या तुलनेत नागरिकांचा अधिक ओढा होता. गतवर्षी गुढीपाडव्याला मुंबईत 86 चारचाकी वाहने खरेदी झाली होती, तर यावर्षी 107 चारचाकी वाहन खरेदी करण्यात आली. यातून राज्य सरकारला 77 लाख 12 हजार 16 रुपये इतका महसूल मिळाला असून, गतवर्षीच्या तुलनेत महसुलामध्ये 83 टक्केे वाढ झाली. चारचाकी वाहनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दुचाकी वाहनांची त्या तुलनेत कमी खरेदी झाली.

- Advertisement -

गतवर्षी 262 दुचाकी खरेदी केल्या होत्या. मात्र, यावर्षी फक्त 198 दुचाकी वाहने खरेदी करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 25 टक्क्यांनी दुचाकी वाहने खरेदीत घट झाली. याचा फटका महसुलावरही बसला आहे. गतवर्षी 12 लाख 41 हजार 30 रुपये महसूल मिळाला होता. यावर्षी ४ लाख 47 हजार 818 इतकाच महसूल मिळाला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची एकंदरीत खरेदी पाहता गतवर्षी 348 वाहनांची विक्री झाली होती. तर यावर्षी फक्त 305 वाहनांची खरेदी झाली. मात्र, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीतून राज्य सरकारला 72 लाख 61 हजार 198 इतके महसूल मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -