घरCORONA UPDATEझोपडपट्टयांमधील सॅनिटायझेशनचे प्रमाण वाढवा!

झोपडपट्टयांमधील सॅनिटायझेशनचे प्रमाण वाढवा!

Subscribe

सद्यस्थितीत नालेसफाईचे काम व्यवस्थित झालेले नाही. परिणामी, इतरही रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

पावसाळा जवळ येत असून मलेरिया, डेंग्यु सारखे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. परंतु सद्यस्थितीत नालेसफाईचे काम व्यवस्थित झालेले नाही. परिणामी, इतरही रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन तातडीने नालेसफाई करण्याच्या आवश्यक सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  मुंबईतील सर्व झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या गोरगरीबांचे आरोग्याचे हित लक्षात घेता झोपडपट्टयांमध्ये सॅनिटायझेशनचे प्रमाण वाढविण्याचीही मागणी केली.

कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होऊ नये व त्यांना उपचारासाठी रुग्णालये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने डॅशबोर्ड तयार करण्याची आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने तयार केलेल्या डॅशबोर्डची पाहणी गुरुवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी करून कोरोनासंदर्भातील कामाचा आढावाही महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षात जावून घेतला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि सुरेश काकाणी यांच्याकडून या या डॅशबोर्डच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहितीही दरेकर यांनी जाणून घेतली. तसेच ही यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित होऊन सामान्य नागरिकांनापर्यंत या डॅशबोर्डची माहिती पोहचविण्यात यावी अशा त्यांनी यावेळी दिल्या. कोरोनोची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला यावेळी. यावेळी भाजपच्यावतीने विविध सुचनांचे निवेदन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले. यावेळी आमदार राहुल नार्वेकर, आमदार प्रसाद लाड, मुंबई महानगरपालिकेचे भाजप गट नेते प्रभाकर शिंदे, नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट उपस्थित होते. दरम्यान या महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील कोरोनो संदर्भातील कामाचा आढावा घेतला.

- Advertisement -

यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगतिले की, विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने डॅशबोर्ड तयार केला आहे. हा डॅशबोर्ड कशाप्रकारे काम करतो हे समजणे आवश्यक आहे. कारण, जर तयार झालेल्या डॅशबोर्डची अंमलबजावणी मुंबईतील रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती मिळविण्यासाठी झाली नाही तर ही केवळ एक तांत्रिक उभारणी होईल. डॅशबॉर्ड नीट तयार झाले असेल तर ५० टक्के रुग्णांवरील दबाव आणि तणाव दूर होऊन त्यांची कमी हेळसांड होईल. म्हणून महानगरपालिकेने तयार केलेल्या डॅशबॉर्डची आपण पाहणी केली असून परळ येथील महानगरपालिका कार्यालयातील डॅशबॉर्डचीही पाहणी करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

अतिरिक्त बेड्सच्या उभारणीसह मनुष्यबळही निर्माण करा

१०,००० अतिरिक्त बेडस् मुंबईमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत असले तरीही याकरीता डॉक्टर, परिचारिका तसेच कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक यंत्रणा यांची पुरेशी संख्या असणे आवश्यक आहे. आधीच मनुष्यबळाची कमतरता असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून या बाबतीत तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या समस्या अधिक गंभीर होत असून या रुग्णांना बेड्सचा तुटवडा, विलगीकरण केंद्रातील अस्वच्छता, ऑक्सीजन सिलेंडरची व व्हेंटिलेटरची कमतरता जाणवत आहे, अतिदक्षता विभात अपुऱ्या खाटा तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई न झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने आता या गंभीर संकटाकडे लक्ष द्यावे व कोरोनोची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी प्रवीण दरेकर यांनी महानगरपालिकेकडे केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -