घरमुंबईलोकशाही निर्देशकांत भारताची घसरण, रोहित पवारांची केंद्रावर टीका

लोकशाही निर्देशकांत भारताची घसरण, रोहित पवारांची केंद्रावर टीका

Subscribe

इकॉनॉमिस्ट इंटलिजन्स युनिटने सादर केलेल्या यादीत नॉर्वे शहर प्रथम स्थानावर

जागतिक लोकशाही निर्देशकांत आपल्या देशाची कामगिरी दरवर्षी खालावत आहे. मागील ६ वर्षांपासून भारताचा पायंडा इकॉनॉमिस्ट इंटलिजन्स युनिटच्या आकडेवारीत घसरताणा दिसत आहे. त्यामुळे ही घसरण देशातील जनतेासाठी धोकादायक असल्याचे राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. इआययूने (इकॉनॉमिस्ट इंटलिजन्स युनिट) चालू वर्ष २०२० मधील लोकशाही निर्देशकांची जागतिक क्रमवारी जाहीर केले. नागरिकांच्या स्वातंत्र्याविरोधात कारवाईमुळे भारताची क्रमवारीत घसरगुंडी झाली आहे. भारताची मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. भारताचे लोकशाही निर्देशकांत २०१४ रोजीच्या अहवालात २७ वे स्थान होते. तर आता २०२० मध्ये ते ५३ व्या स्थानावर आले आहे. हे नागरिकांसाठी घातक आहे. लोकशाही मूल्ये हा भारताचा आत्मा असून लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाही याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवायला हवं असा टोला आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे.

लोकशाही मूल्यावर दडपण आल्यामुळे भारताची कामगिरी लोकशाही निर्देशकांत घसरली आहे. इकॉनॉमिस्ट इंटलिजन्स युनिटने सादर केलेल्या यादीत नॉर्वे शहर प्रथम स्थानावर आहे. या यादीत एकूण १६७ देशांचा समावेश असतो. या यादीत सदोष लोकशाही, मिश्र सत्ता आणि हुकूमशाही देशांत असे वर्गीकरण करण्यात आले आहे. भारताचे नाव हे सदोष लोकशाही गटात असून या गटात अमेरिकेचाही समावेश आहे.

- Advertisement -

या लोकशाही निर्देशकांत भारताची घसरण झाली असल्यामुळे राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केद्र सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, #EIU च्या लोकशाही निर्देशांकात आपल्या देशाची कामगिरी दरवर्षी खालावत असून २०१४ मध्ये असलेलं २७ वं स्थान २०२० मध्ये ५३ पर्यंत घसरलंय. हे नागरिकांसाठी घातक आहे.लोकशाही मूल्ये हा भारताचा आत्मा असून लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाही याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवायला हवं.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -