घरCORONA UPDATECoronaEffect: अखेर एसटी कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी सुरू

CoronaEffect: अखेर एसटी कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी सुरू

Subscribe

एसटी महामंडळाने एसटी चालक आणि वाहकांच्या आरोग्य तपासणीसाठी थर्मल स्क्रिनिंगच्या १०० मशीन्स खरेदी केल्या आहेत.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र कर्तव्यावर असलेल्या एसटी चालक आणि वाहकांवर कोरोनाचे सावट होते. एसटीतील कामगार संघटनेने सुद्धा कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची मागणी केली होती. मात्र मागणीची दखल एसटी महामंडळाकडून घेतली जात नव्हती. परंतू गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संकट वाढत गेले आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळानेही त्याची दखल घेत थर्मल स्क्रिनिंगच्या १०० मशीन्स खरेदी केल्या आहेत. तसेच एसटी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यास सुरुवात केली आहे.

या आगारांमधील कर्मचाऱ्यांची तपासणी 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे आणि अन्य वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. परंतू अत्यावश्यक सेवा देणाऱ्या हॉस्पिटलचे कर्मचारी, डॉक्टर्स, महापालिका कर्मचारी, पोलीस, बँक तसेच शासनाच्या सेवेतील काही कर्मचाऱ्यांना आपली सेवा बजावता यावी यासाठी एसटी महामंडळाकडून मुंबई, ठाणे आणि पालघर या तीनही विभागातून एसटी बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. आता बसेसची संख्यासुद्धा वाढवण्यात येत आहे. या तिन्ही विभागात सेवा बजावणाऱ्या एसटी कामगारांची आता थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू नगर, पनवेल या आगारात थर्मल स्क्रिनिंगमार्फत कर्मचाऱ्यांची तपासणी होत आहे.

- Advertisement -

मिळाल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल आणि परळ हे दोन्ही आगार कोरोना हॉटस्पॉटमध्ये आले आहे. त्यामुळे या दोन्ही आगारात काम करणारे एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कोरोनाचे सावट होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षा उपायोजना करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने थर्मल स्क्रिनिंगच्या १०० मशीन्स उपलब्ध केल्या आहेत. या मशीन्समार्फत चालक, वाहक, वाहतूक नियंत्रण, यांत्रिकी कर्मचारी यांची तपासणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

गरीब, गरजूंच्या अन्नवाटपांवर १५ दिवसांत १८ कोटींचा खर्च

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -