घरक्राइमISIS Module Case: ISIS साठी पडघा बनवलं होतं 'मुक्त क्षेत्र'; 'तो' तरुणांना...

ISIS Module Case: ISIS साठी पडघा बनवलं होतं ‘मुक्त क्षेत्र’; ‘तो’ तरुणांना देत होता ‘ही’ शपथ

Subscribe

राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने शनिवारी (9 डिसेंबर) ठाण्यात छापेमारी करत 15 जणांना अटक केली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी धाडी टाकत एनआयएने ISIS शी संबंधित 15 जणांना बेड्या ठोकल्या.

मुंबई : राज्यातील ISIS मॉड्युल उद्ध्वस्त करत राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने 15 दहशतवाद्यांना शनिवारी (9 डिसेंबर) अटक केली. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पुढे आले आहे. असे असतानाच या कारवाईतून अनेक खुलासे समोर येत असून, ISIS साठी दहशतवादी नाचन याने पडघा या गावाला ‘अल शाम’ म्हणजेच ‘मुक्त क्षेत्र’ म्हणून घोषित केलं होतं. पडघ्यात ISIS साम्राज्य तयार करण्यासाठी तो प्रभावशाली मुस्लिम तरुणांना त्यांचं घर सोडून या ठिकाणी येण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचीही माहिती आता समोर येत आहे. (ISIS Module Case A free zone was created for ISIS He was giving this oath to the youth)

राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने शनिवारी (9 डिसेंबर) ठाण्यात छापेमारी करत 15 जणांना अटक केली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी धाडी टाकत एनआयएने ISIS शी संबंधित 15 जणांना बेड्या ठोकल्या. आरोपींमध्ये आयसिस मॉड्युलच्या नेत्याचादेखील समावेश आहे. त्याने अन्य सदस्यांना बयाथ म्हणजेच संघटनेसाठी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली होती. आणि मुस्लिम तरुणांना संघटनेत जोडून घेण्यासाठी तो सतत प्रयत्न करत असल्याचाही खुलासा समोर आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “जे लोक मनाने मोठे असतात ते…”, DEEPAK KESARKAR यांनी केले नारायण राणेंचे तोंड भरून कौतुक

मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

शनिवारचा दिवस हा राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी मोठा दिवस ठरला. तपास यंत्रणा एनआयएच्या 80 गाड्या परिसरात दाखल झाल्या. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोकड, धारदार शस्त्रास्त्रं, गुन्हेगारी कृत्यांच्या तयारीशी संबंधित कागदपत्रं, स्मार्ट फोन आणि अन्य डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा : मोदींचा पराभव केल्याशिवाय संविधान आणि लोकशाही वाचणार नाही – Sanjay Raut

बेसावध असतानाच तपास यंत्रणांनी साधला डाव

शनिवारी पडघा गावाशेजारी असणाऱ्या बोरीवलीत लग्न सुरू होतं. लग्नाच्या तयारीत सर्वजण गुंतलेले असतानाच एनआयएने छापेमारी केली. यावेळी खळबळ उडाली होती. तर दहशतवादी नाचन कुटुंबातील काही आरोपी या लग्नाला जाणार होते मात्र त्याआधीच त्यांच्यावर छापेमारी आणि अटकेची कारवाई करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -