घरमुंबईकोरोनामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी जगजीवन राम हॉस्पिटल बंद

कोरोनामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी जगजीवन राम हॉस्पिटल बंद

Subscribe

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी जगजीवन राम हॉस्पिटल बंद केल्यानंतर तात्पुरती आरोग्य सुविधा मुंबई सेंट्रल येथे उपलब्ध

पश्चिम रेल्वेचे जगजीवन राम हॉस्पिटल रेल्वे प्रशासनाने कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या हजारो रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांचे उपचार बंद झाल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे संघटनांनी याचा विरोध केला होता. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती आरोग्य सुविधा मुंबई सेंट्रल येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

कोरोना हे जागतिक संकट देशासमोर उभे आहे. मात्र या संकटावर मात करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्राणांची बाजी लावत आहेत. लॉकडाऊननंतर पुन्हा रेल्वे सज्ज होण्यासाठी रेल्वे कर्मचारी लॉकडाऊन काळात काम करत आहेत. इतकेच नव्हे तर या कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी आयसोलेशन वॉर्ड व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी रेल्वेच्या कारशेडमध्ये अहोरात्र रेल्वे कर्मचारी काम करत आहेत. एकीकडे आम्ही जनतेला आरोग्य सुविधा देण्याचे काम करतो आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची आरोग्य सुविधा हिसकावून घेण्याचे काम करत असल्याचा आरोप रेल्वे संघटनांकडून होत होता.

रेल्वेने आमच्या मागणीला सकारात्मक उत्तर देत, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती आरोग्य सुविधा मुंबई सेंट्रलच्या डिस्प्रेसिंग मध्ये सुरू केली आहे. तसेच इतर सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. रेल्वे प्रशासनाने जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या काळजी बरोबर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे गरजे आहे.

– जे. आर. भोसले,जनरल सेक्रेटरी, वेस्टन रेल्वे एम्प्लॉईज युनियन

- Advertisement -

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी केली तात्पुरती मेडिकल सुविधा

पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून जगजीवन राम हॉस्पिटलची ओ.पी.डी आणि ऑपरेशन थिएटर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून रेल्वे कर्मचाऱ्यांना खूप समस्यांना सामोरं जावे लागत होते. या संबधित इंडियन रेल्वे मन फेडरेशन आणि वेस्टन रेल्वे एम्प्लॉईज युनियनकडून रेल्वे बोर्डच्या अध्यक्ष तसेच पश्चिम रेल्वेच्या रेल्वे महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिले आहे. तसेच पश्चिम रेल्वेने प्रशासनाने पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती आरोग्य सुविधा तात्काळ मुंबई सेंट्रलच्या डिस्प्रेसिंग मध्ये सुरू केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या

जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सुविधा केलेली आहे. मात्र या हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या परिसरात रेल्वे कॉलनी तसेच भारतीय रिझर्व बँक कर्मचाऱ्यांची कॉलनी आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने सर्व उपाययोजना रेल्वे प्रशासनाने करण्याची मागणी केली आहेत. तसेच रेल्वे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हॅन्ड ग्लोज, मास्क आणि पीपीई किट्स सारख्या सर्व सुविधा रेल्वे प्रशासनाने द्याव्यात जेणेकरून कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होणार नाही. अशी मागणी वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी जे. आर. भोसले यांनी केली आहे.


CoronaVirus: कोरोनाशी लढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान ऑन ड्युटी २४ तास
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -