घरठाणेजितेंद्र आव्हाड यांची समजूत घालण्यासाठी सांगलीहून आलो - जयंत पाटील

जितेंद्र आव्हाड यांची समजूत घालण्यासाठी सांगलीहून आलो – जयंत पाटील

Subscribe

पुलाच्या उद्घटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे आले तेव्हा खूप गर्दी होती. तेव्हा त्याच गर्दीतून मार्ग काढत जितेंद्र आव्हाड पुढे येत होते

जितेंद्र आव्हाड (jitendra awad) यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देत आहे असे ट्विट करत सांगितले. आव्हाडांनी हे ट्विट करताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) हे सांगलीहून थेट मुंबईत त्यांची समजूत काढण्याठी आले आहेत. त्याच संदर्भांत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. सांगलीहून येताना जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात जो प्रकार घडला आहे त्याचा आढावा मी प्रवासात घेतला आहे. इथे आल्यावर याप्रकरणी मला आणखी काही माहिती मिळाली. ज्या महिलेने आव्हाडांवर गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकार घडण्यापूर्वी त्याच महिलेचा जितेंद्र आव्हाड यांनी भगिनी म्हणून संबोधले. याची क्लिप तुम्ही सर्वानीच पहिली. त्यामुळे आव्हाड यांच्या मनात स्त्रियांबद्दल आदराभाव आहे समजते.

- Advertisement -

पुलाच्या उद्घटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm mukhymantri shinde) तिथे आले तेव्हा खूप गर्दी होती. तेव्हा त्याच गर्दीतून मार्ग काढत जितेंद्र आव्हाड पुढे येत होते आणि त्यावेळी त्या महिलासुद्धा तिथेच होत्या तेव्हा आव्हाड यांनी त्या महिलेला बाजूला व्हा असे सांगिलते. आणि तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याचं आश्चर्य वाटतं आहे. असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

या प्रकारणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला त्यावरही जयंत पाटील म्हणाले, एखाद्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल असे वागणे. सदर घटनेत पुरुषाने स्त्रीला मुद्दामहून लज्जा उत्पन्न होईल असे वागणे हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे.अश्लील शब्द वापरणे किंवा चुकीच्या भावनेने महिलेला स्पर्श करणे म्हणजे विनयभंग आहे. विनयभंगाची व्याख्या स्पष्ट करत जयंत पाटील यांनी पोलीस आणि राज्य सरकारला प्रश्न विचारला की विनयभंगाच्या या व्याख्येत काल घडलेली घटना कुठे बसते? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात कुठेही जाताना किंवा अगदी देवळात जातानासुद्धा धक्काबुक्की होते. किंवा कोणालाही बाजूला जा असे सांगण्यात येते. यामुळेच महाराष्ट्र आणि ठाणे पोलीस यांनी 354 कलम मध्ये हे प्रकरण कसं बसवलं? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कायद्याची मोडतोड करून एखाद्याला गुन्हेगार ठरविण्याचे काम जाणीवपूर्वक होत असेल तर महाराष्ट्रात पोलीस खात्यात कश्याप्रकारे काम चालतं हे गृह खात्याने पाहणं गरजेचे आहे असं जयंत पाटील म्हणाले. हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांसमोर घडला त्यामुळे त्यांनी त्यात हस्तक्षेप करणे गरजेचे होते. त्याठिकाणी पोलीस अधिकारी सुद्धा उपथित होते. अश्या परिस्थितीत एख्याद्या महिलेला बाजूला व्हा असे सांगणे हा विनयभंग नाही असं मला वाटतं असे जयंत पाटील म्हणाले.

हर हर महादेव चित्रपटात शिवाजी महाराज यांचा चूकीचा इतिहास दाखवला त्याविरोधात आव्हाडांनी जी भूमिका घेतली त्याला राष्ट्रवादीचे सुद्धा समर्थन आहे असं जयंत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही क्लिप पाहावी असे जयंत पाटील म्हणाले.


हे ही वाचा – मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला…; ऋता आव्हाडांचा संताप

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -