घरमुंबईमतदान केंद्रात चक्कर आलेल्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू

मतदान केंद्रात चक्कर आलेल्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू

Subscribe

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील निळजे गावातील मतदान केंद्रावर पांडे यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र मतदान केंद्रावर त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले

कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडलेला अशोक पांडे या कर्मचा-याचा शुक्रवारी मुंबईतील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पांडे यांच्या मृत्यूने पालिकेत हळहळ व्यक्त होत आहे. कोळसेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार पार पडले. यावेळी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

उपचारा दरम्यान पांडे यांचा मृत्यू

कल्याणातील कोळसेवाडी परिसरात राहणारे पांडे हे पालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीला होते. लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील निळजे गावातील मतदान केंद्रावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. रविवारी मतदान केंद्रावर ते पोहचले होते. मात्र त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. इतर कर्मचा-यांनी त्यांना उचलून बाजूला बसवले. त्यांच्या कुटूंबाला तातडीने कळविण्यात आले. त्यानंतर पांडे यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना मुंबईच्या केईएम रूग्णालयात हलविण्यात आले होते.

- Advertisement -

नातेवाईकांनी केली मदतीची मागणी

अशोक पांडे यांच्यावर गेल्या ५ दिवसापासून उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान आज पांडे यांचा मृत्यू झाला. पांडे आजारी पडल्यानंतरही निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांच्या प्रकृतेची चौकशीही केली नसल्याने पांडे यांच्या कुटूंबियांनी नाराजी व्यक्त केली. पांडे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने निवडणूक आयेागाकडून त्यांना मदत मिळावी अशी त्यांच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे.

मगरे कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत

मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी भगवान आसाराम मगरे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते . या संदर्भात मृत कर्मचारीच्या कुटुंबियांना 30 लाख रुपये आर्थिक मदत मिळावी अशी मागणी कामगार कर्मचारी महासंघ या कामगार संघटनेने केली होती. या मागणीची दखल घेत उल्हासनगरचे प्रांत अधिकारी आणि निवडणूक साहाय्यक अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी तहसीलदार कार्यालयास मगरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -