घरमुंबईपत्रीपूलाच्या कामाची नाराजी सत्ताधाऱ्यांना भोवणार!

पत्रीपूलाच्या कामाची नाराजी सत्ताधाऱ्यांना भोवणार!

Subscribe

कल्याण-भिवंडी पत्रीपूलाचे काम जैसे थे असल्याने, प्रचंड वाहतूक केांडीचा मनस्ताप नागरिकांना दररोज सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

कल्याणचा पत्रीपूल पाडून तब्बल सहा महिन्याचा कालावधी लोटला, मात्र, अजूनही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. पत्रीपूलाचे काम जैसे थे असल्याने, प्रचंड वाहतूक केांडीचा मनस्ताप नागरिकांना दररोज सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. कल्याण आणि भिवंडी या दोन्ही मतदार संघाला लागूनच पत्रीपूल आहे. त्यामुळे पत्रीपूलाच्या कामाची नाराजी सत्ताधाऱ्यांना भोवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्वसामान्य, वाहनचालक कंटाळले

कल्याणचा पत्रीपूल हा कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा असला तरी सुध्दा भिवंडी-कल्याण शीळ हा रस्ता प्रामुख्याने कल्याणच्या पत्रीपूलावरून जातो. त्यानंतर हा रस्ता पुढे नवी मुंबई तळोजा पनवेल मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठया प्रमाणात ये जा सुरू असते. ब्रिटीशकालीन असलेला पत्रीपूल धोकादायक बनल्याने ऑगस्ट २०१८ मध्ये वाहतूकीसाठी बंद करून एका महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. रेल्वे आणि एमएसआरडीसी याठिकाणी नवीन पूल उभारणार आहेत. ३० डिसेंबर २०१८ ला पत्रीपूलाच्या कामाचे भूमिपूजनही पार पडले. तांत्रिक कामामुळे कामाला विलंब लागत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, मध्यंतरी लोकसभा निवडणुका जाहिर होण्याआधीच पूलाच्या डागडुजीच्या कामाची सुरूवात करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनंतर हे कामही बंद पडले. पत्रीपूल पाडण्यात आल्याने दुसऱ्या बाजूकडील पुलावर बॅरिगेट्स टाकून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू आहे. ऑगस्ट २०१८ ते एप्रिल २०१९ या आठ महिन्याच्या कालावधीत एका पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने प्रचंड वाहतूक केांडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा खोळंबा पत्रीपूलावर सहन करावा लागत आहे. दररोजच्या वाहतूक केांडीला सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक कंटाळले आहेत.

- Advertisement -

नाराजीचा सात्ताधाराना फटका

कल्याण पत्रीपूलावरील वाहतुकीमुळे शहरातील विविध भागात आणि चौकातही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अंतर्गत वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. तसेच कल्याण शीळ रस्त्यावरही लोढा जंक्शन मानपाडा परिसरात वाहतूक केांडी होत असते. कल्याण पश्चिमेकडून पूर्वेला जाण्यासाठी तसेच कल्याणहून डोंबिवलीला जाण्यासाठी १५ ते २० मिनीटांच्या प्रवासाला एक-एक तास लागतो. एकिकडे पत्रीपूलाच्या कामाचा पत्ता नसताना दुसरीकडे मात्र अवघ्या आठ दिवसात पत्रीपूलाला लागून तीन मोठ- मोठी होल्डींग थाटली गेली आहेत. त्या होल्डिंगवर निवडणुकीच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांची नाराजी मतपेटीत उमटून त्याचा सत्ताधाऱ्यांना फटका बसू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -