घरदेश-विदेशयासिन मलिकला जन्मठेप, एनआयएच्या विशेष कोर्टाचा निर्णय

यासिन मलिकला जन्मठेप, एनआयएच्या विशेष कोर्टाचा निर्णय

Subscribe

बुधवारी या प्रकरणी अंतिम सुनावणी झाली. यासिन मलिकला कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला फाशीची शिक्षा की जन्मठेप होते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला (Kashmiri separatist leader Yasin Malik) दहशतवादी फंडिंग प्रकरणात ( terror funding case) एनआयएच्या विशेष न्यायालयाने जन्पठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली आहे.  विशेष एनआयए न्यायालयात (NIA court) बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली. गुन्हेगारी कट, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि काश्मीरची शांतता बिघडवणे यासह बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्याच्या कलमांखाली यासीन मलिकवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यासीन मलिकनेही हे आरोप मान्य केले होते. न्यायालयाने  19 मे रोजी यसिन मलिकला दोषी ठरवले होते.

बुधवारी या प्रकरणी अंतिम सुनावणी झाली. यासिन मलिकला कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला फाशीची शिक्षा की जन्मठेप होते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यावेळी पतियाळा न्यायालयाने यासिन मलिकला जन्मठेप आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. दहशतवादी बुरहानी चकमकीत ठार झाल्यानंतर २०१६-२०१७ मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली होती. एनआयएने यासीन मलिक आणि अन्य फुटीरतावाद्यांना अटक केली होती.

- Advertisement -

न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, मसरत आलम, नईम खान, मोहम्मद युसुफ शाह, शाबीर शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, मोहम्मद अकबर खांडे, बशीर अहमद भट, राजा मेहराजुद्दीन कलवाल, जहूर अहमद शाह वताली, फरार अहमद शाह, फरार अहमद शाह यांना अटक केली होती. शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. यासिन मलिकला कलम 120 नुसार 10 वर्षे कारावास आणि कलम 121 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासिनची रवानगी तिहार जेलमध्ये होणार आहे. एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

यासिन मलिकने जम्मू काश्मीरमधील दहशतवादी आणि बेकायदेशीर कारवायांसाठी पैसे जमवण्यासाठी जगभरात एक नेटवर्कची निर्मिती केली होती. एनआयएने  स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत ३० मे २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. तर एक डझनपेक्षा अधिक लोकांविरुद्ध १८ जानेवारी २०१८ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. यासिन मलिकने १९९० मध्ये दहशतवाद्यांसोबत वायूसेनेच्या अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -