घरमुंबईकेम्प्स कॉर्नरवरील मार्ग वाहतुकीला खुला

केम्प्स कॉर्नरवरील मार्ग वाहतुकीला खुला

Subscribe

रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रस्ते वाहतुक बंद राहणार

गेल्या महिन्यात ६ ऑगस्टच्या पावसामुळे केम्प्स कॉर्नर परिसरात दरड कोसळून काही माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे अनेक दिवस या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. पण आता काही ठराविक काळातच या मार्गावरील वाहतुक सुरू करण्याचा निर्णय मुंबई वाहतुक पोलिसांनी घेतला आहे. काही ठराविक वेळेतच या भागातील रस्ते वाहतुक सुरू असेल असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

kemps corner landslide

- Advertisement -

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एन.एस. पाटकर मार्गावरील वाहतुक ही नानाचौकातून वळविण्यात आली होती. त्यामुळे ताडदेव परिसरातही मोठी वाहतुक कोंडी होत होती. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठीच आता पाटकर मार्गावर काही वेळेतच वाहतुक सुरू असणार आहे. दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक एन.एस. पाटकर मार्गावरून सकाळी ६ ते दुपारी २.३० या कालावधी सुरू राहील. तर दुपारी २.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतुक ही उत्तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक सुरू राहील. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मात्र या मार्गावर कोणतीही वाहतुक सुरू राहणार नाही असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

याआधी गेल्या महिन्यात हँगिंग गार्डनजवळील एका तटबंदीचा काही भाग कोसळला आणि रस्त्याला तडे गेले होते. दरड कोसळल्यानं आणि तडे गेल्यानं केम्प्स कॉर्नरकडे जाणारा रस्ता, पाण्याच्या पाईप लाईन खराब झाल्या होत्या. डोंगराच्या उतारावरील सुमारे १५ झाडे उपटून गेली. सुरक्षा भिंत आणि रस्त्यावरील तडे पुन्हा दुरुस्त करेपर्यंत या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते. रस्त्याच्या कामासाठी हँगिंग गार्डन ते कॅम्प्स कॉर्नर ट्रॅफिक सिग्नलपर्यंतचा रस्ता तीन महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -