किरीट सोमय्या जाणार राणा दाम्पत्याच्या भेटीला

अटकेनंतर रवी राणा यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात तर नवनीत राणा यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. आता ११ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोघांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला गेले होते. बुधवारी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे आता सोमय्या पुन्हा एकदा त्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.

अटकेनंतर रवी राणा यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात तर नवनीत राणा यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. आता ११ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी ते आपल्या खार येथील निवासस्थानी असणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या तुरुंगातून सुटताच मी नवनीत राणा आणि रवी राणा यांची त्यांच्या खार मुंबई येथील निवासस्थानी भेट घेईन, असे ट्टिवट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी अटक केली होती. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी किरीट सोमय्या गेले होते. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला  केला. त्यांच्या कारवर चप्पल, बाटल्या फेकत घोषणाबाजी केली. यामध्ये सोमय्यांच्या तोंडाला दुखापत होऊन हनुवटीवरून रक्त येत होते.