घरमुंबईकोपरी परिसरात तरुणावर चाकूने वार

कोपरी परिसरात तरुणावर चाकूने वार

Subscribe

कोपरी परिसरात भररस्त्यावर दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. या घटनेचा राग मनात धरुन एका अल्पवयीन मुलाने लोकांच्या समोरच अरुण रेलवानी यांच्या पाठीत आणि हातावर चाकूने वार करुन पोटात चाकू खुपसला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या दोन साथीदार भावांना कोपरी पोलिसांनी अटक केली. जखमी अरुण याला आरोग्यम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार करून सायंकाळी त्याला घरी सोडण्यात आले. या अल्पवीन आरोपीने परिसरातील गाड्यांवर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

21 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता कोपरी कॉलनीत बिल्डींग नंबर 4 येथे अल्पवयीन मुलगा व त्याचे मित्र हे हेमा सोळंखी यांच्या भावाचा मुलगा राहुल माळी यास मारहाण करत होते. यावेळी घटनास्थळी एक मुलगा हातात दगड घेऊन पार्क केलेल्या गाड्यावर विनाकारण दगड फेकून दहशत निर्माण करत होता. यावेळी तक्रारदार निर्मला काळे यांनी आणि परिसरातील लोकांनी या अल्पवयीन मुलाला रोखले असता त्याने आणि त्याचे भाऊ हरेश आणि दिनेश यांनी लोकांनाच उलट शिवीगाळ केली. याच दरम्यान, हा अल्पवयीन मुलगा हातात चाकू घेऊन तेथील लोकांवर धावून आला. त्याला रोखण्यासाठी अरुण समोर आला असता या मुलाने अरुणवर चाकूने वार केले. तसेच या अल्पवयीनाच्या साथीदारांनीही अरुणला मारहाण केली. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून कोपरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

पोलिसांनी या अल्पवयीनाला 2 साथीदार भावांसह ताब्यात घेतले. आरोपीचे वय 18 वर्षाच्या आत असल्याने कोपरी पोलिसांनी त्याला भिवंडी येथे बालसुधारगृहात पाठविले आहे. तसेच त्याचे भाऊ हरेश तेलुरे आणि दिनेश तेलुरे या दोघांना ठाणे न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपी अल्पवयीन मुलावर याआधीही चोरीचे विविध गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -