घरमुंबईएनसीसी कॅडेट विकास दोरगे राजपथावर

एनसीसी कॅडेट विकास दोरगे राजपथावर

Subscribe

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट विकास दोरगे याची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणार्‍या संचलनासाठी महाराष्ट्रातून निवड झाली. या संचलनासाठी जूनपासून निवड प्रक्रिया सुरू होऊन जवळ जवळ नऊ कॅम्प पूर्ण होऊन कॅडेट्सची निवड केली जाते.

यामध्ये उंची, ड्रिल, टर्न आउट व शारीरिक तंदुरुस्ती याचा प्रामुख्याने विचार केला जातो. प्रथम बटालियन स्तरावर नंतर ग्रुप व शेवटी राष्टीय स्तरावर निवड होते. या प्रक्रियमध्ये हजारो कॅडेट सहभागी होतात. या तयारीसाठी त्याला 6 महाराष्ट्र बटालियनचे कमान अधिकारी कर्नल शिरीष पांड्ये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर नुकतेच महाविद्यालयाला नॅक कडून ‘अ’ दर्जा मिळाला आणि अशातच महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट विकास दोरगे याची दिल्ली येथे निवड होणे हा महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

- Advertisement -

या यशाबद्दल एन .सी.सी ऑफिसर लेफ्टनंट रामदास जमनूके, उपप्राचार्य डॉ. ए .डी. आढाव, प्रा.जी.जे कोराणे, ग्रंथपाल सुनील अवचित्ते, डॉ.नरेश मढवी, डॉ.आर.पी.म्हात्रे, डॉ.प्रफुल वशेणीकर, डॉ.यशवंत उलवेकर, प्रा.नितीन ससाणे व सर्व एन .सी.सी कॅडेट्सनी त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -