घरमुंबईराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत

राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसने माने गटाला सातत्याने गृहित धरल्याने तसेच हातकणंगले मतदारसंघ माने गटाचा असताना अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी बहाल करण्याचे ठरवल्याने माने गट नाराज झाला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या समारंभात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवेदिता माने यांच्या हातावर शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, संजय मंडलिक हे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आज त्यांनी सुध्दा शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन हातात बांधले.

सगळीकडे भगवा फडकेल

दरम्यान उध्दव ठाकरे यांनी असे म्हटले आहे की, कोल्हापुरातील शिवसेनेच्या दादा मंडळींना हक्काची ताई मिळाली आहे. कोल्हापूरातून सुरू झालेली ही वारी सगळीकडे पसरेल आणि सगळीकडे भगवा फडकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने माने गटाला सातत्याने गृहित धरल्याने तसेच हातकणंगले मतदारसंघ माने गटाचा असताना अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी बहाल करण्याचे ठरवल्याने माने गट नाराज झाला होता.

- Advertisement -

निवेदिता यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला

शेट्टी आणि माने गट यांच्यात राजकीय वैमनस्य पूर्वीपासूनच आहे. परंतू माने गटाला; डावलून पवार यांनी शेट्टी यांना जवळ केल्याने निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. भाजप की, शिवसेना असे दोन पर्याय त्यांच्यापुढे होते. त्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला. निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी अगोदरच शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजू शेट्टी मतदारसंघात लोकप्रिय असले तरीही माने गट त्यांना जोरदार टक्कर देईल, अशी चर्चा आहे.

पवारांकडे दिला होता राजीनामा

निवेदिता माने यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आपला राजीनामा सूपूर्द केला होता. यापूर्वी निवेदिता माने यांनी लोकसभेत हातकणंगलेचे प्रतिनिधित्व केले आहे. आता शेट्टी तेथील खासदार आहेत. माने गटाची मतदारसंघातील ताकद पाहता लोकसभेला शेट्टी आणि धैर्यशील माने अशीच लढत होण्याची शक्यता आहे. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना माने त्यांच्या भेटीला गेले नव्हते. तसेच पवार आणि शेट्टी यांची भेट झाल्यानंतर भावी समीकरण काय असेल ते स्पष्ट झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – 

राष्ट्रवादी ,शिवसेना सह काँग्रेस मधील २४ नगरसेवक संपर्कात – भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -