घरमुंबईदिवा रेल्वे स्थानकावर महिलांचा 'रेल रोको'; मध्य रेल्वे विस्कळीत

दिवा रेल्वे स्थानकावर महिलांचा ‘रेल रोको’; मध्य रेल्वे विस्कळीत

Subscribe

महिला डब्यातील काही प्रवाशांनी दरवाजा अडवून ठेवला होता. यामुळे दिवा स्थानकातील महिलांना डब्यात चढता आले नाही. या प्रकाराने संतप्त झालेल्या महिलांनी आज रेल रोको करत आंदोलन केले.

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात संतप्त महिला प्रवाशांनी दरवाजा अडवणाऱ्या महिलांविरोधात रेल रोको केला. महिलांनी आज सकळी अचानक रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे. रेल्वेच्या दरवाजावर उभ्या राहणाऱ्या महिला आत शिरु देखील देत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज दिवा स्थानका दरम्यान रुळावर उतरुन कर्जत रेल रोको करत आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतुक २० मिनिटे उशीराने धावत होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर लोकल मार्गस्थ झाली आहे.

- Advertisement -

यामुळे करण्यात आला रेल रोको

रेल्वेच्या दरवाजावर उभ्या राहणाऱ्या महिला आत शिरु देत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज दिवा येथील मध्य रेल्वेवर रेल रोको करत आंदोलन केले आहे. कर्जत, कसारा येथून सुटणाऱ्या जलद लोकल दिवा स्थानकात थांबतात. मात्र, काही प्रवासी लोकलचा दरवाजा अडवून ठेवतात. त्यामुळे दिवा स्थानकात लोकलमध्ये प्रवाशांना चढता येत नाही. दिवा स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर गुरुवारी सकाळी असाच प्रकार घडला. सकाळी ६.५६ मिनिटांनी मुंबईकडे जाणारी जलद लोकल दिवा स्थानकात आली असता, महिला डब्यातील काही प्रवाशांनी दरवाजा अडवून ठेवला होता. दिवा स्थानकातील महिलांना डब्यात चढता आले नाही. या प्रकाराने सतप्त झालेल्या महिलांनी दरवाजात उभ्या असलेल्या महिलांना खाली खेचले. त्यानंतर घडलेला प्रकार मोटरमनच्या कानावर घातला. काही महिला प्रवासी थेट रुळांवर उतरल्या आणि लोकल रोखून धरण्याचा प्रयत्न केला. जवळपास १० ते १५ मिनिटे लोकल थांबवून ठेवली. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलकांना हटवून वाहतूक सुरळीत झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -