घरमुंबईठाण्यात लेक सिटी मॉलला भीषण आग

ठाण्यात लेक सिटी मॉलला भीषण आग

Subscribe

अग्निशमन कर्मचार्‍यांना धुराचा त्रास

ठाण्यातील कापूरबावडी येथील लेक सिटी मॉलला शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दल आणि ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. मॉलच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या नामदेव झोरे या कर्मचार्‍याची सुखरूप सुटका करण्यात आली. प्रचंड पसरलेल्या धुराचा अग्निशमन कर्मचा-यांना त्रास झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

ठाणे पश्चिमेकडील कापूरबावडी नाक्यावर बाळकुम फायर स्टेशनजवळ लेकसिटी मॉल आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागून आगीची धग दुसर्‍या मजल्यापर्यंत पोहचली. संपूर्ण मॉलमध्ये धुराचे लोट पसरल्याने मॉलमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

- Advertisement -

घटनस्थळी पोहचलेल्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने मॉलच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या नामदेव झोरे या मॉल कर्मचार्‍याची सुखरूप सुटका करून त्यांना नजिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर, आगीवर नियंत्रण मिळवताना संघर्ष करावा लागत असल्याने अग्निशमन दलातील तांडेल, रवींद्र शेलार यांना धुरामुळे श्वास कोंडल्याने त्रास झाला. त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले असून दोघांचीही प्रकृती चांगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -