युवासेनेने दिले युवतींना अत्याचाराविरोधात आत्मसंरक्षणाचे धडे

देशातील मुलींवरील वाढते शोषण आणि लैंगिक अत्याचार याविरुद्ध स्वसंरक्षणासाठी प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण युवासेनेच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थीनींना देण्यात आले.

Lessons on self-defense against oppression by young women
युवासेनेने दिले युवतींना अत्याचाराविरोधात आत्मसंरक्षणाचे धडे

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त युवासेनेच्या वतीने शहरातील युवतींच्या हल्ल्यांना परतवून लावण्याचे प्रात्यक्षिके देऊन आत्मरक्षणाचे धडे देण्यात आले. देशातील मुलींवरील वाढते शोषण आणि लैंगिक अत्याचार याविरुद्ध स्वसंरक्षणासाठी प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण युवासेनेच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थीनींना देण्यात आले.

युवा सेनाप्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर युवा अधिकारी बाळा श्रीखंडे आणि शाखाप्रमुख केशव ओवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या आत्मरक्षण प्रशिक्षणाचा प्रारंभ शहाड विभाग गावठाण महाविद्यालयातील विद्यार्थीनींना प्रात्यक्षिक देऊन करण्यात आला. यावेळी शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी विद्यार्थीनींना आपल्यावरील शारीरिक अन्याया सोबतच सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शोषणाविरुद्ध ही लढायला सज्ज व्हायला हवे, असे सांगितले. तर मुलींनी आता आत्मसंरक्षणासोबतच आत्मसन्मानाची लढाई लढणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

मुलींच्या स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाची मोहीम

ड्रॅगन कराटे अकॅडमीच्या माध्यमातून मुलींची छेड काढणाऱ्या, अतिप्रसंग करू पाहणाऱ्या रोडरोमियोंना चोख उत्तर देण्यारे आणि बचाव करणारी प्रात्यक्षिके यावेळी मुलींना देण्यात आले. तर मुलींच्या स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाची ही मोहीम आता शहरातील सर्व शाळा महाविद्यालयातून आपण निरंतर सुरु ठेवणार असल्याची ग्वाही आयोजक बाळा श्रीखंडे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, शहरसंघटक सागर उटवाल, युवासेना संपर्क प्रमुख निखिल वाळेकर, युवा सेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, शाखाप्रमुख केशव ओवळेकर, गणेश श्रीमाळवे, ज्ञानेश्वर मरसाळे, पप्पू जाधव, शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


हेही वाचा – धक्कादायक! मित्रांच्या मदतीने पतीने घडवला पत्नीवर बलात्कार