घरमुंबईराज्य पोलीस दलाच्या चिन्हातील हाताच्या पंजावर प्रश्नचिन्ह

राज्य पोलीस दलाच्या चिन्हातील हाताच्या पंजावर प्रश्नचिन्ह

Subscribe

चिन्ह बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र पोलीस दल हे काँग्रेस पक्षाचे समर्थक असून काँग्रेसचा प्रचार करीत असल्याचा विचित्र आरोप बीड जिल्ह्यातील एका समाजसेवकाने केला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या चिन्हात बदल करावा अथवा काँग्रेस पक्षाचे हाताच्या पंजाचे चिन्ह बदलावे, अशी विलक्षण तक्रार अर्ज पनझाडे यांनी मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाकडे करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

बाळासाहेब पनझाडे समाजसेवक असून बीड शहरातील स्वराज्यनगर येथे राहतात. व्यापार सांभाळून बीड जिल्ह्यात समाजसेवा करणारे बाळासाहेब यांनी ही विचित्र मागणी मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोग यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे चिन्ह हे पोलीस दलाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या चिन्हात जो हाताचा पंजा दर्शविण्यात आला आहे, तो हात म्हणजे ‘अभय मुद्रा’ दुष्कर्म करणार्‍यांविरूद्ध संरक्षणाची दृढ आश्वासन दर्शवणारा आहे.

- Advertisement -

मागील अनेक दशकापासून महाराष्ट्र पोलीस दलाचे हे चिन्ह प्रतीक आहे. मात्र गेल्या अनेक दशकानंतर पोलीस दलाच्या या चिन्हावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. अख्या महाराष्ट्रात राज्य पोलीस दलात सुमारे पावणे दोन लाखापेक्षा अधिक पोलीस फोर्स आहे. पोलिस वाहन, गणवेष यांच्यावर राज्य पोलीस दलाचे चिन्ह असून त्या चिन्ह्यात दर्शवलेला हाताचा पंजा आहे. मात्र हाताचा पंजा हे काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्यामुळे राज्य पोलीस दलाकडून निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाचा प्रचार होत असल्याचा आरोप बीड मधील समाजसेवक बाळासाहेब पनझाडे यांनी केला आहे.

मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, या चिन्हावर पूर्णपणे अभ्यास करून काही अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा करूनच महाराष्ट्र निवडणूक आयोग तसेच मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला असल्याचे पनझाडे यांनी दै. आपलं महानगरशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र पोलीस दलातील चिन्हातील हाताच्या पंजाचे निशाण निवडणुकीच्या काळात काढून टाकावे अन्यथा काँग्रेस पक्षाची निवडणूक लढवण्यासाठी दुसरे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी पनझाडे यांनी मुख्यमंत्री तसेच निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रार अर्जात केली आहे.

- Advertisement -

पनझाडे यांनी १०जानेवरी २०१९रोजी मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, निवडणुकीच्या काळात लाखो पोलीस गणवेश परिधान करून बंदोबस्तावर असतात, तसेच राज्यभर हजारोच्या संख्येने पोलीस वाहने रस्तावर उतरतात त्यावेळी राज्य पोलीस दलाच्या चिन्हात असलेला हाताचा पंजामुळे आचार सहितेचा भंग होत आहे. मतदारांमध्ये काँग्रेसचा प्रचार होत असल्याचे अर्जात म्हटले आहे. हा प्रकार टाळण्यासाठी एकतर काँग्रेसचे चिन्ह बदलावे अथवा पोलीस दलाच्या चिन्हातील हाताच्या पंजाचे चिन्ह काढण्यात यावे, अशी मागणी पनझाडे यांनी केली आहे.

मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून मी एक साधा व्यापारी आहे. त्यातून वेळ मिळाला की, मी आमच्या जिल्ह्यात समाजसेवा करतो. पोलीस दलाचे प्रतीक असलेले चिन्ह याबाबत माझे काही म्हणणे नाही, मात्र त्या चिन्हात दर्शविलेल्या हाताच्या पंजावर माझा आक्षेप आहे. या चिन्ह्यामुळे निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाचा प्रचार होत असून त्यामुळे आचारसंहिता भंग पावते. त्यामुळे हे चिन्ह हटवावे अथवा काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या दरम्यान दुसरे चिन्ह देण्यात यावे ही माझी मागणी आहे. या हाताच्या चिन्हाबाबत आमच्या जिल्ह्यातील अनेक पोलिसांकडे चौकशी केली, मात्र या चिन्हाबाबत आमच्या जिह्यातील पोलिसांना काहीही माहिती नाही. मी तक्रार अर्ज केल्यापासून मला अनेक धमकीचे कॉल येत आहेत. तसेच मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जात आहे.
-बाळासाहेब पनझाडे, तक्रारदार, समाजसेवक बीड.

महाराष्ट्र पोलीस दलाचे हे चिन्ह राज्य पोलीस दलाचे प्रतीक असून या चिन्हात जो हात दर्शविण्यात आला आहे,तो हात म्हणजे ‘अभय मुद्रा’ दुष्कर्म करणार्‍यांविरूद्ध संरक्षणाचे दृढ आश्वासन दर्शवणारा आहे. यातून कुठल्याही पक्षाचा प्रचार होऊच शकत नाही, ही मागणी निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असू शकते.
-वरिष्ठ पोलीस अधिकारी

राज्य पोलीस दलाच्या चिन्हात असलेल्या हाताच्या पंजामुळे जर काँग्रेसचा प्रचार होत असेल तर,मतदारांना हात लपवून फिरावे लागेल, समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह सायकल आहे तर निवडणुकीच्या काळात सायकलवर पण बंदी घाला, अशीही मागणी करण्यात येईल. ज्या कोणी या प्रकारचा तक्रार अर्ज केला आहे तो केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली आहे.
-सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -