घरताज्या घडामोडी३१ जानेवारीपासून एलआयसीच्या 'या' योजना होणार बंद

३१ जानेवारीपासून एलआयसीच्या ‘या’ योजना होणार बंद

Subscribe

१ फेब्रुवारीपासून या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

एलआयसी धारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. याशिवाय जे कोणी एलआयसी योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असतील त्यांनी देखील ही बातमी जरुर वाचावी. कारण ३१ जानेवारी पासून एलआयसीच्या २३ योजना बंद करणार आहेत. म्हणजे १ फेब्रुवारीपासून या बंद योजनेचा लाभ घेता येणार नाही. इरडा म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जीवन विमा कंपन्यांना काही योजना बंद करण्यास सांगितलं होत. तसंच नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ज्या योजना त्यामध्ये बसत नाहीत अशा देखील योजना बंद करण्याचा आदेश दिला होता. मात्र ही मुदतवाढ करून ती ३१ जानेवारी पर्यंत करण्यात आली होती. २९ फेब्रुवारी २०२० चा पर्यंतची मुदत सध्या असलेल्या योजनांमध्ये बदल किंवा पुन्हा परवानगी मिळविण्यासाठी देण्यात आली आहे.

इरडाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. यामध्ये ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अनेक एजंटवर लगाम लावण्याचा इरडाचा मुख्य उद्देश आहे. विमा पॉलिसी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला ग्राहकभिमुख बनावायची आहे. म्हणून त्यांचा ग्राहकाला जास्तीतजासत फायदा पोहोचविण्याचा उद्देश देखील आहे.

एलआयसीच्या या २३ योजना होणार बंद

एलआयसी जीवन लक्ष्य
एलआयसी जीवन तरुण
एलआयसी जीवन लाभ प्लान
एलआयसी न्यू जीवन मंगल प्लान
एलआयसी जीवन उमंग
एलआयसी आधार शिला
एलआयसी स्तंभ
एलआयसी जीवन शिरोमणि
एलआयसी विमा श्री
एलआयसी भाग्यलक्ष्मी प्लान
एलआयसी माइक्रो बचत
एलआयसी न्यू एंडोमेंट प्लस
एलआयसी न्यू एंडोमेंट प्लन
एलआयसी प्रीमियम वेवर रायडर
एलआयसी न्यू मनी बॅक – २०साल
एलआयसी न्यू जीवन आनंद
एलआयसी अनमोल जीवन
एलआयसी लिमिटेड प्रीमियम एंडोमेंट प्लान
एलआयसी न्यू चिल्ड्रंस मनी बँक प्लान
एलआयसी न्यू ग्रुप ग्रेच्युटी कॅश एक्युमुलेशन प्लान
एलआयसी न्यू ग्रुप सुपरएन्युएशन कॅश एक्युमुलेश प्लान
एलआयसी न्यू ग्रुप लीव इनकैशमेंट प्लान
एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -