घरताज्या घडामोडीएसटी कर्मचारी लावतात एसटीला चुना

एसटी कर्मचारी लावतात एसटीला चुना

Subscribe

प्रवाशांना मार्ग फलक दिसावा म्हणून क्लुप्ती

ग्रामिण भागाची लालपरी अर्थात एसटी बसचे मार्गफलक नादुरूस्त आहेत.त्यामुळे एसटी गाड्यांवरील मार्ग फलकावर लिहिले असल्याने बहुतेक प्रवाशांना गाडीचा नेमका मार्ग बाहेरून कळत नाही.त्यामुळे एसटी बसेसच्या काचेवर मार्ग लिहिण्यासाठी तंबाखूसाठीचा चुना वापरण्यात येत आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात 18 हजार 500 गाड्यांचा समावेश आहे. यातील फक्त केवळ 2 हजार गाड्यांना डिजिटल मार्ग फलक लावण्यात आले आहेत. 16 हजार 500 गाड्यांना डिजिटल फलकच नाही. तसेच लोखंडी पत्र्यांचे फलक आहेत. यातील अनेक लोखंडी मार्ग फलक नादुरस्त आहे. इतकेच नव्हे तर ज्या गाड्यांत मार्ग फलक आहेत ते एसटीच्या वरच्या भागात असल्यामुळे प्रवाशांना एसटी गाडी कुठे जात आहे हेच कळत नाही. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी यासंबंधीत आगारात तक्रार सुध्दा केली होती.

- Advertisement -

आगारात एसटी बस लावताच नेमकी कोणत्या मार्गावरील एसटी जाणार आहे हे प्रवाशांना माहिती व्हावे म्हणून चालक किंवा वाहकांकडून खडूने काचेवर गाडीचा मार्ग लिहिला जातो. मात्र आगारांत खडू उपलब्ध होत नसल्याने, बहुतेक वाहक तंबाखूमध्ये वापरण्यात येणारा चुना वापरत असल्याचे सर्रास दिसते.एका वाहकाने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले की, आम्हा एसटी खडू देत नाही.त्यामुळे आम्हाला स्वत:च्या पैशाने खडू आणावा लागतो. मात्र खडूने सुध्दा काचेवर लिहलेले दिसून येत नाही. त्यामुळे आम्हा नाईलाजाने तंबाखूचा चुना वापरावा लागतो.

नव्या गाड्यांना सुध्दा चुना

एसटी महामंडळात अत्याधुनिक शिवशाही ,विठाई तसेच नॉन एसी स्लीपर बसेस आल्या आहेत. या गाड्यांत सुध्दा डिजिटल मार्ग फलक आहे. मात्र अनेक वेळा गाड्या वेगळ्या मार्गाने वळविण्यात येतात. तेव्हा त्या मार्गांची नोंद नसल्यामुळे सुध्दा बसेसच्या काचेवर पाण्यात कालवलेल्या चुन्याने लिहिलेली अक्षरे नाईलाजास्तव काचेवर लिहावी लागतात. आता एसटी महामंडळात येणार्‍या नव्या गाड्यांना डिजिटल मार्ग फलक आहेत. मात्र वेळप्रसंगी ते उपयोगात येत नाहीत.

- Advertisement -

प्रत्येक आगारात पेंटर पण…

एसटीच्या विभाग नियंत्रक स्तरावर महामंडळाने पेंटरची नियुक्ती केलेली आहे. हे पेंटर गाडीसमोरील मार्ग फलक रंगवण्याचे काम करतात. त्यामुळे चालक व वाहकांनी संबंधित पेंटरकडून कामगिरी बजावत असलेल्या मार्गावरील नाम फलक तयार करून घेण्याची गरज आहे. संबंधित आगाराच्या व्यवस्थापकाने ही जबाबदारी चोख बजावण्याची गरज आहे. मात्र प्रत्येक जण आपल्या स्तरावर जबाबदारी पार पडत नसल्याने प्रवाशांसमोर एसटी महामंडळचे हसू होत असल्याची प्रतिक्रिया महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -