घरमुंबईमुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलसह अंबानी कुटुंबीयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलसह अंबानी कुटुंबीयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी

Subscribe

मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स हॉस्पीटलला उडवण्याबरोबर कॉलरने अंबानी कुटुंबाला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आज दुपारी लँडलाईन नंबरवर धमकीचा फोन आल्याने सांगण्यात येत आहे. सध्या मुंबई पोलिसांकडून हा कॉल नेमका कुठून आला याचा शोध घेत आहे. महाराष्ट्राबाहेर हा फोन आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे संबंधित आरोपीचे कॉल लोकेशन ट्रेस केले जात आहेत.

हॉस्पिटलच्या लँडलाइन नंबरवर कॉल करणाऱ्याने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि त्यांची मुले आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी डीबी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलिसांनी इतर सुरक्षा यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाइन नंबरवर दुपारी 12:57 वाजता एका अज्ञात नंबरवरून कॉल आला, यावेळी अज्ञात व्यक्तीने रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश आणि अनंत अंबानी यांनीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फोन करणाऱ्याने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही दिली आहे.

मागच्या महिन्यातही अंबानी कुटुंबियांना धमकीचा फोन आला होता. यापूर्वी 15 ऑगस्टलाही रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये असाच फोन आला होता. रिपोर्ट्सनुसार, त्या व्यक्तीने हॉस्पिटलच्या डिस्प्ले नंबरवर आठ धमकीचे कॉल केले होते, ज्यामुळे मुकेश अंबानी यांच्या जीवाला धोका होता.


‘दसरा मेळावा स्वाभिमानाचा’, सभेच्या काही तास आधी शिंदे गटाचा नवा टीझर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -