घरताज्या घडामोडीLok Sabha 2024: धक्कादायक.. कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानमुळे मोहोळांच्या रॅलीत अनर्थ टळला!

Lok Sabha 2024: धक्कादायक.. कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानमुळे मोहोळांच्या रॅलीत अनर्थ टळला!

Subscribe

पुणे – पुण्यातील लोकसभेसाठीचे भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये एक छोटासा पण विचित्र प्रसंग घडला. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला. ज्या रथामधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महायुतीचे अन्य उमेदवार जात होते. त्या रथापुढून काही महिला आणि लहान मुली रस्ता ओलांडत असताना अचानक रथ पुढे जाऊ लागल्याने एका लहान मुलीच्या पायाला दुखापत झाली. कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत रथाच्या चालकाला गाडी थांबविण्यास सांगितल्याने अनर्थ टळला. यानंतर कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला रस्ता ओलांडू दिला आणि मगच रथ पुढे रवाना झाला. नियत असे किरकोळ दुखापत झालेल्या मुलीचे नाव आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होते. हळूहळू ही रॅली डेक्कनच्या दिशेने निघाली होती.
नळस्टॉप चौकात दुपारी 12 च्या सुमारास रॅली आली असताना तिथे जेसीबीच्या साह्याने मोहोळ आणि अन्य नेत्यांना मोठा हार घालण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी रॅलीचा ट्रक काहीवेळासाठी या चौकात थांबला होता. त्याचवेळी रथापुढून काही महिला आणि लहान मुली रस्ता ओलांडत होत्या. तितक्यात रथ हळूहळू पुढे सरकू लागल्यानंतर त्याचा धक्का लागल्याने एका लहान मुलीच्या पायाला दुखापत झाली. हा प्रकार बघितल्यावर रथापुढे असलेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच रथ चालविणाऱ्या चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला आणि लगेचच गाडी थांबविण्यात आली. कार्यकर्त्यांनी या मुलीला आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या कुटुंबियांना पूर्णपणे रस्ता ओलांडू दिला आणि त्यानंतर रथ पुढे नेण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : Pune Traffic Jam : भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या रॅलीमुळे पुण्यात वाहतूक कोंडी

ही घटना घडली त्यावेळी प्रस्तुत प्रतिनिधी तिथे उपस्थित होता. त्याने नंतर संबंधित कुटुंबियांची चौकशी केली. त्यावेळी तिने पायाला दुखापत झाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी योग्यवेळी रथ थांबविण्याची सूचना केल्यामुळे पुढे काही अघटित घडले नाही, असे संबंधित कुटुंबाने सांगितले.

- Advertisement -

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -