घरताज्या घडामोडीMahaparinirvana Din: महापरिनिर्वाण दिनासाठी बाहेरून येणाऱ्यांना प्राधान्य द्या, मुंबईकरांनो ऑनलाईन अभिवादन करा,...

Mahaparinirvana Din: महापरिनिर्वाण दिनासाठी बाहेरून येणाऱ्यांना प्राधान्य द्या, मुंबईकरांनो ऑनलाईन अभिवादन करा, महापौरांचे आवाहन

Subscribe

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने नियमावली जाहीर केली होती. येत्या ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीवर जाहीर कार्यक्रम करण्यास राज्य सरकारने बंदी घातली. तसेच सभा, संमेलन किंवा मोर्चा काढण्यास देखील राज्य सरकारने मनाई केली. दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाणदिनी मुंबईकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करा आणि बाहेरून येणाऱ्या अनुयायांना प्राधान्य द्या, असे महापौर किशोर पेडणेकर यांनी आवाहन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादर चैत्यभूमीवर केलेल्या तयारीचा आढावा देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली नियमावली ठरवण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०१९साली ऑनलाईन दर्शनाची सुविधा केली गेली होती. त्यानंतर २०२०मध्ये ऑफलाईन पद्धतीने आंबेडकरांचे दर्शन देण्यास परवानगी दिली. यंदाही सर्वांना ऑफलाईन-ऑनलाईन पद्धतीने आंबेडकरांचे दर्शन घेता येणार आहे. चैत्यभूमीवर सर्वांना दर्शन दिले जाणार आहे. यावेळी सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.’

- Advertisement -

‘सध्या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटचे संकट आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबईकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करावे आणि बाहेरून येणाऱ्या अनुयायांना प्राधान्य द्यावे. दरम्यान महापरिनिर्वाण दिना दिवशी सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे. पोटभरले एवढे सुकं अन्न देण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच शौचालयाची व्यवस्था ठिकठिकाणी केली गेली आहे,’ अशी माहिती मुंबईच्या महापौरांनी दिली.


हेही वाचा – Omicron : महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमीवर जाहीर कार्यक्रमास बंदी, राज्य सरकारची नवी नियमावली


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -