घरमुंबईस्थलांतरित मजुरांशिवाय मुंबईत कारखाने ठप्प! कामं करण्यास माणसं नाहीत

स्थलांतरित मजुरांशिवाय मुंबईत कारखाने ठप्प! कामं करण्यास माणसं नाहीत

Subscribe

लॉकडाऊनमुळे सर्व मजुर कामगारांना आपल्या घरी पाठवण्यात आले होते, मात्र आता हेच कामगार आपल्या कामावर हजर राहण्यासाठी तयार नाही

महाराष्ट्रातून स्थलांतरित मजुरांच्या परतण्याचा परिणाम उद्योगांवर आता दिसून येत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योग आता हळूहळू सुरू होत आहेत. सोशल डिस्टेन्सिंग, मास्क, सॅनिटायझर इत्यादी सर्व वस्तूंची कारखान्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र तेथे कमतरता असेल तर ती मजुरांची… दरम्यान उद्योगधंदे सुरू झाले असूनही मजुरांशिवाय तेथे शांतता असलेल्याचे दिसत आहे.

मुंबईच्या औद्योगिक भागात सामान्यपणे मजुरांची वर्दळ असायची. परंतु या कोरोना संकटादरम्यान या औद्योगिक भागात मोजकेच लोकं दिसताय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एनएस इंडस्ट्रीज कारखान्याचे मालक जगजित सिंह असून त्याचा लघुउद्योग आहे. सहसा २५ मजुर कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात, परंतु सध्या येथे केवळ ४ लोकं काम करताना दिसताय. कारण सर्व परप्रांतीय मजुर कामगार लॉकडाऊन दरम्यान आपल्या घरी परतले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

१०० मजुरांऐवजी फक्त १० मजुर हजर

तसेच, ठाण्यातील प्रशांत कॉर्नर फूड फॅक्ट्रीमध्ये देखील वेगळी परिस्थिती नाही. या फूड फॅक्ट्रीमध्ये मिठाई बनवल्या जातात. हा एक मोठा उद्योग असून त्यांचे ६ आउटलेट्स आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची दुकाने पुन्हा उघडली आहेत, परंतु त्यांच्याकडे मजुरांची प्रचंड कमतरता भासत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिटची परिस्थिती बघता, जेथे १०० मजुर सामान्य दिवशी काम करत होते, मात्र कोरोना संकटादरम्यान, तेथे फक्त १० मजूर काम करत आहेत. इतर सर्व मजुर कामगारांनी लॉकडाऊनदरम्यान नोकरी सोडून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतल्याने ते सध्या त्यांच्या गावी आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व मजुर कामगारांना आपल्या घरी पाठवण्यात आले होते, मात्र आता हेच कामगार आपल्या कामावर हजर राहण्यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

…म्हणून पुन्हा एकदा जामा मस्जिद बंद करण्याची शक्यता!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -