घरमुंबईअभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीला अपघात, मनसैनिकांनी रुग्णालयात केले दाखल

अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीला अपघात, मनसैनिकांनी रुग्णालयात केले दाखल

Subscribe

बॉलिवूड अभिनेक्री मलाइका अरोराच्या गाडीला पनवेलजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मलाइका अरोराच्या कार चाकलाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुण्याहून राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन गाड्यांना मलायकाच्या गाडीने धडक दिली.

या घटनेत अभिनेत्री मलायका अरोराच्या डोक्याचा दुखापत झाली आहे. तिला उपचारांसाठी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. महाराष्ट्र निर्माण सेनेचे कोल्हापूरचे संपर्क अध्यक्ष आणि जनहित संघटनेचे सरचिटणीस जयराज लांडगे यांनी दिली आहे. त्यांनीच मलायकाला रुग्णालयात दाख केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

- Advertisement -

जयराज लांडगे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभेला पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना पनवेलनजीक मलाइका अरोरा हिचा ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि तिची कार मनसेच्या तीन गाड्यांना येऊन धडकली, या घटनेत तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

- Advertisement -

दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मनसेचे नेते लांडगे आणि त्यांचे सहकारी राज साहेब ठाकरे यांच्या सभेच्या दिशेन रवाना झाले. दरम्यान लांडगे यांच्या या प्रसंगावधानाने सर्वत्र कौतुक होत आहे.


शरद पवारांमुळेच जातीपातीच राजकारण महाराष्ट्रात सुरू झालं – राज ठाकरे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -