घरमुंबईओव्हरहेड वायरला हात लावून केला आत्महत्येचा प्रयत्न

ओव्हरहेड वायरला हात लावून केला आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

बोईसर रेल्वे स्थानकावर ओव्हर हेड वायरला पकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. त्याच्या या प्रयत्नाने पश्मिम रेल्वे काही काळ खोळंबली.

नातेवाईकांना कंटाळून रेल्वेच्या ओव्हर हेड वायरीला पकडून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पश्चिम रेल्वेच्या बोईसर स्थानकावर हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पश्चिमरेल्वेच्या दहाणू कडून येणाऱ्या गाड्या काही काळ उशीराने धावत होत्या. आत्महत्या करण्यासाठी हा तरुण रेल्वे स्थानकाच्या पूलावरून ओव्हर हेड वायरला पकडण्यासाठी गेला होता. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ  या वायरिंचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. मात्र या घटनेनंतर काही वेळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वे सुरक्षा दलाने या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

कसा घडला प्रकार

आज सकाळी हा तरुण बोईसर रेल्वे स्थानकावर आला होता. यातरुणाकडे एक चाकू होता. रेल्वे पूलावर जाऊन त्याने ओव्हरहेड वायरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे स्थानकावरील उपस्थित प्रवाशांनी आरडा ओरड सुरु केली. रेल्वे प्रशानाने यानंतर वीजपुरवठा बंद केला. दुर्घटना होणाऱ्यापूर्वी विजपुरठा बंद करण्यात आल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले. नातेवाईकांकडून छळ होत असल्याने या तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रातिनिधक माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -