घरCORONA UPDATEदेहविक्री करणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी मराठी कलाकारांचा पुढाकार!

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी मराठी कलाकारांचा पुढाकार!

Subscribe

मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.

कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर देशातील लॉक डाऊन ३ मेपर्यत वाढविण्यात आला आहेत,  अशा परिस्थिती सर्व मुंबईत आणि उपनगरातील  जवळजवळ पन्नास हजार देहविक्री करणाऱ्या महिलांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. मात्र त्यांच्या मदतीसाठी मुंबईतील साई संस्थाच्या  माध्यमातून समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन देहविक्री करणाऱ्या महिलांना त्यांना मदत करत आहे. इतकेच नव्हे तर आता मराठी  आणि हिंदी चित्रपट श्रुष्टीतील कलाकारांनी सुद्धा देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केले आहेत.

देशभरात लॉकडाऊन असल्याने मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिलांनावर मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र साईसंस्थानने मुंबईतील आठ रेड लाईट भागात दररोज जेवणाची व्यस्था केली आहे. कामाठीपुरा जमुनामेशन, पाववाला स्ट्रीट, फॉकलंड रोड,  गिरगांव, ग्रँड रोड, वरळी आणि शिवडी अशा  ८ देहविक्री परिसरात जेवणाचे पॉकेट वितरित करण्यात येत आहे.  दररोज प्रत्येक परिसरात ४५० ते ६००  जेवणाचे पॉकेट वितरित करण्यात येत आहे. आतापर्यत १२ हजार जेवणाचे पॉकेट वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे या साई संस्थेला प्रोत्सहन देण्यासाठी आणि मदत करण्याकरिता मराठी श्रुष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, विजय कदम आणि हिंदी चित्रपटातील अभिनेता मिलिंद गुणाजी  यांनी मदतीसाठी साई संस्थाशी संपर्क केला आहेत.

- Advertisement -

कलाकारांनी केले आवाहन

साई संस्था गेली कित्येक वर्षांपासून कामाठीपुरातील वारांगनाच्या विकासाठी आणि पुर्नवसांसाठी काम करत आहे. मी गेली दोन वर्ष नारळ पौर्णिमेला त्यांच्याकडून राखी बांधून घेतली आहे. तेव्हा लक्षात आले कि, या संस्थेत काम करणाऱ्या सर्व सहकार्य करणाऱ्यांना या महिला घरच्या सारखे मानतात. साई संस्था गेली २३ दिवसापासून भोजनाची व्यस्था करत आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना समाजातील सर्वाना हिच विनंती करतो की, आपला शक्य जमेल ती मदत करावीत,  पैसेच दिले पाहिजे असं नाही. तर डाळ, तांदूळ किंवा तेल देऊन या महान कार्यात योगदान द्यावे असे आवाहन नाट्यअभिनेते विजय कदम यांनी केली आहेत.

- Advertisement -

सध्या लॉक डाऊन काळात रेड लाईट परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांना अन्नाचा पुरवठा करण्याचे काम साई संस्था आणि अनेक दानशुरु करत आहेत. यात आपल्याकडून सुद्धा मदत झाली पाहिजे मी सुद्धा संस्थेचा मदत केली आहे. तुम्ही सुद्धा खारीचा वाटा उचला असे आवाहन अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनेतला केले आहे.

देहविक्री करणाऱ्या महिला नेहमीच समाजात दुर्लक्षित घटक आहे. त्यांच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहे. सध्या कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. त्यांच्या मदतीसाठी आम्ही अन्नदान करत आहोत. आमच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदतीला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी पुढाकार घेतलेला आहे. आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.- विनय वस्त, संस्थापक, सोशल अ‍ॅक्टिव्हीज इंटिग्रेशन संस्था.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -