Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन गायिका वैशाली माडे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ

गायिका वैशाली माडे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ

Related Story

- Advertisement -

गायिका वैशाली माडे ३१ मार्च रोजी हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असून वैशाली माडे मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. दुपारी १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भातील माहिती दिली असून वैशाली माडे हिनेही या बातमीला दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे.

गायिका वैशाली माडे हिच्याबद्दल…

वैशाली माडे हिने अनेक चित्रपटात गाणी गाण्यासह मराठी मालिकांची शीर्षक गीतं देखील गायली आहेत. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानं वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली माडे एका सामान्य कुटुंबातील असून चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायिका असा प्रवास हा देखील संघर्षमय आहे. अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे तिचा जन्म झाला असून तिचं माहेरचं नाव वैशाली भैसने आहे. बालपणी गरिबीमुळे त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले. मात्र, खडतर परिस्थितीत तिने स्वतः मधील गायिका जिवंत ठेवली. वैशाली हिच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

इरादा पक्का (२०१०), मध्यमवर्ग (२०१४), हंटर (२०१५), कॅरी ऑन (२०१५), ३१ दिवस (२०१८), रणांगण (२०१८) , आटपाडी नाईट्स (२०१९) अशा मराठी चित्रपटांसह दमादम्म (२०११), बाजीराव मस्तानी (२०१५), अंग्रेजी में कहते है (२०१७) कलंक (२०१९) या हिंदी चित्रपटात देखील गाणी गायले आहेत. यासह वैशाली माडे ही २००८ मध्ये ‘झी मराठी’च्या मराठी ‘सा रे ग म प’च्या पर्वाची विजेती ठरली. हाच तिच्या आयुष्याचा ‘टर्निंग पाँईंट’ ठरला. येथून पुढे २००९ मध्ये तिने ‘झी’च्या हिंदी ‘सा रे ग म प’मध्ये आपलं नशिब आजमावल आहे.

 

- Advertisement -