Wednesday, April 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कुर्ला येथील गुलाब इस्टेटमधील गोदामाला भीषण आग

कुर्ला येथील गुलाब इस्टेटमधील गोदामाला भीषण आग

Related Story

- Advertisement -

मुंबईतल्या कुर्ला येथील गुलाबी इस्टेटमधील गोदामाला भीषण आग लागल्याचे समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या भीषण आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले आहेत. अग्निशमन दल अथक प्रयत्न करत आग विझवत आहेत. आतापर्यंत एक तास उलटून गेला असून अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही आहे. तसेच अजूनही या आगीचे कारण अस्पष्ट असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. दरम्यान या आग लागलेल्या ठिकाणी जास्त दाटीवाटीची लोकवस्ती असल्यामुळे अग्निशमन दलाला थोड्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

भर दुपारी आग लागल्यामुळे यंत्रणाची धावपळ उडाली. या भीषण आगीच्या धुराचे लोट तीन किलोमीटर अंतरापर्यंत पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ही आग लेव्हल २ची आहे. सध्या घटनास्थळी ८ फायर इंजीन आणि ८ फायर टँकर दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. माहितीनुसार, या परिसरामध्ये वाहनाच्या पार्ट्सचे अनेक गोदाम आहे. आतापर्यंत ३ ते ४ दुकानं या आगीत भस्मसात झाली आहेत.

जीवितहानी नाही पण साहित्याचे नुकसान|Fire breaks out in gulab estate in Kurla

कुर्ला येथील गुलाब इस्टेटमधील गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही मात्र, साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहे. परंतु, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, April 7, 2021

- Advertisement -

 

- Advertisement -