घरताज्या घडामोडीजोगेश्वरी भीषण आग: दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

जोगेश्वरी भीषण आग: दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

Subscribe

मुंबईतील जोगेश्वरीतील गोदामला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या रवाना झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या ही आग आटोक्यात आली आहे. या घटनेत सुदैवाने जीविहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अद्याप या आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशमन दलाचे तब्बल दोन तास या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – कर्करोगाशी सामना करत अमृता देतेय दहावीची परीक्षा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -