घरमुंबईमाथाडी कामगार बेमुदत संपावर; राज्य सरकारने फसविले

माथाडी कामगार बेमुदत संपावर; राज्य सरकारने फसविले

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांना दिलेली आश्वासने न पाळता या कामगारांना जाचक ठरणारा अध्यादेश विधिमंडळात गोंधळात मंजूर केला. त्यामुळे माथाडी आणि व्यापारीवर्गाने संताप व्यक्त करत आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये पुकारलेला लाक्षणिक संप आता बेमुदत सुरू करण्याची घोषणा केली आहे.

राज्य सरकारने अखेर माथाडी कामगारांना फसविले. मुख्यमंत्र्यांनी वारंवार दिलेली आश्वासने न पाळता आज या कामगारांना जाचक ठरणारा अध्यादेश विधिमंडळात गोंधळात मंजूर केला. त्यामुळे माथाडी आणि व्यापारीवर्गाने संताप व्यक्त करत आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये पुकारलेला लाक्षणिक संप आता बेमुदत सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बाजारसमित्या बेमुदत बंद राहणार आहेत.

एपीएमसी बाजार अतिरिक्त कर आकारतात

केंद्र शासनाने एपीएमसी कायद्यात बदल करून थेट पणन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र एपीएमसी बाजार आवारात सेवा शुल्क नावाखाली अतिरिक्त कर लादल्याने याविरोधात आज वाशी येथील एपीएमसी आवारात बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये माथाडी, व्यापारी आणि वाहतूक व्यावसायिक सहभागी झाल्याने पाचही बाजार आवारात शुकशुकाट होता. सकाळी सर्व बाजार आवारात व्यापार्‍यांनी बैठक घेऊन आपली दुकाने बंद केली. वाद्यांच्या निनादात व्यापार्‍यांनी रस्त्याने मिरवणूक काढून सरकार विरोधात घोषणाबाजी करत धान्य बाजारात सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी जमा झाले.

- Advertisement -

वाचा – ई-नाम पद्धतीविरोधात व्यापारी आक्रमक; मंगळवारी बंदची हाक!


यामुळे घेण्यात आला बेमुदत बंदचा निर्णय

माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने महाराष्ट्रातील तमाम माथाडी, सुरक्षा रक्षक कामगार आणि व्यापारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी आज लाक्षणिक बंद आणि आझाद मैदानात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे उपोषण आंदोलन सुरू असताना सरकारने न्याय मागणीकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व नियमण) अधिनियम – १९६३ यात आणखी सुधारणा करण्यासाठी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने काढलेला अध्यादेश क्रमांक २४ ला विधिमंडळात गोंधळात मंजुरी दिल्याचे समजल्याने हा बेमुदत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

वाचा – मुख्यमंत्र्यांकडून माथाडी कामगारांना कमळ तर प्रकल्पग्रस्तांना काटे


माथाडी, सुरक्षा रक्षक कामगारांवर राज्य सरकारच्या पणन, कामगार आणि अन्य विभागांकडून वारंवार अन्याय करणारे निर्णय एकतर्फी काढण्यात आले त्याला रोखण्यासाठी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीची डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली असून या कृती समितीत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अविनाश रामिष्टे, चंद्रकांत शेवाळे, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे बळवंतराव पवार, प्रकाश पाटील, हमाल पंचायत युनियनचे डॉ. बाबा आढाव, राजकुमार घायाळ, अखिल महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पोपटशेठ पाटील, प्रकाशदादा पाटील, राष्ट्रवादी सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या श्रीमती मंदाताई भोसले, हणमंतराव सुरवशे, कापड बाजार मराठा कामगार युनियनचे जयवतंराव पिसाळ, दत्तात्रय कृष्णा जगताप या प्रतिनिधींचा समावेश आहे.


वाचा – एपीएमसी मार्केटलाही पावसाचा तडाखा


महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व नियमण) अधिनियम – १९६३ यात आणखी सुधारणा करण्यासाठी सहकार,पणन आणि वस्त्रो द्योग विभागाने काढलेला अध्यादेश क्रमांकाला स्थगिती देण्यासाठी माथाडी आणि व्यापारी वर्गाने बंद पुकारला होता. आज झालेल्या सभेत ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी आमदार नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष व माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, तसेच व्यापारी प्रतिनिधीक असोसिएशनचे पदाधिकारी मोहन गुरनानी, संजय पानसरे, किर्ती राणा, अशोक बढीया, अमृतलाल जैन, महेंद्र भाई, अशोक भेंडे, पिंगळेशेठ, शरद मारु आदी प्रतिनिधी यांचे मार्गदर्शन झाले व या सभेमध्ये सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बेमुदत संप जाहीर करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -