घरक्रीडाहॉकी वर्ल्ड कप २०१८ चा शुभारंभ!

हॉकी वर्ल्ड कप २०१८ चा शुभारंभ!

Subscribe

हॉकी वर्ल्ड कप २०१८ चा शुभारंभ ओडिसातील भुवनेश्वर येथे झाला असून या उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती.

हॉकी वर्ल्ड कप २०१८ चा शुभारंभ आज, २७ नोव्हेंबर रोजी ओडिसातील भुवनेश्वर येथे झाला असून या उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. भुवनेश्वरमधील कलिंग स्टेडियममध्ये हा रंगारंग सोहळा पार पडला. यावेळी ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह बॉलीवूडचे किंग शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित उपस्थित होते. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी टुर्नामेंटचा शुभारंभ केला असून त्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांनी परफॉर्मन्स सादर केले. बुधवार, २८ नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून पहिला सामना कॅनडा विरोधात बेल्जियम असा रंगणार आहे. तर दुसरा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये जगभरातील निवडक १६ संघाचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

वाचा : हॉकी वर्ल्ड कपच्या अॅंथम साँगचे टीजर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -