घरमुंबईकुर्ल्यातील 'तो' भूखंड विनाचर्चा मंजूर

कुर्ल्यातील ‘तो’ भूखंड विनाचर्चा मंजूर

Subscribe

कुर्ला काजूपाडा येथील वादग्रस्त भूखंडावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून कोंडीत पकडण्याच्या भितीने महापौरांनी यावर कोणालाही बोलू न देता हा प्रस्ताव विनचर्चा मंजूर केला.

कुर्ला काजूपाडा येथील वादग्रस्त भूखंडावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्याकडून कोंडीत पकडण्याच्या भीतीने महापौरांनी यावर कोणालाही बोलू न देता हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे विरोधकानी महापौरांच्या कारभारावर टीका करत महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.विरोधी पक्षामुळे हा प्रस्ताव आला असून हा विरोधकांचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण

कुर्ला येथील उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव नामंजूर करत प्रशासनाकडे परत पाठवला. मात्र, यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेत सत्ताधारी शिवसेनेने भूखंडाचे श्रीखंड लाटल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाच्या आरोपांनंतर पहारेकरी जागे झाले आणि विरोधी पक्षाच्या मागणीनुसार हा प्रस्ताव पुन्हा सभागृहात सादर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांची कानउघडणी केली. त्यांच्या आदेशानुसार सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्तांना पत्र लिहून हा प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. यासर्वांची दखल घेत आयुक्तांनी या भूखंडाचा प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या पटलावर ठेवला होता.

- Advertisement -

काय म्हणाले महापौर

भूखंडाच्या या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख आदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी करत याचा निषेध केला.
यानंतर महापौरांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव अर्धातास उशिरा पोहोचले. विरोधकांच्या मागणीनुसार नाही तर उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -