घरमुंबईअखेर महापौरांनी माफी मागितली

अखेर महापौरांनी माफी मागितली

Subscribe

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या सभेला तब्बल साडेतीन तास उशिराने सभागृह सुरू केल्याने विरोधी पक्षांसह भाजपने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा निषेध व्यक्त केला. महापौरांनी माफी मागण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने बहिष्कार घालत सभात्याग केला. परंतु महापौरांनी दिलगिरी व्यक्त करताच राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि भाजपाचा विरोध मावळला आणि सभेच्या कामकाजाला महापौरांनी सुरुवात केली.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या सभेला तब्बल साडेतीन तास उशिराने सभागृह सुरू केल्याने विरोधी पक्षांसह भाजपने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा निषेध व्यक्त केला. महापौरांविरोधात सदस्यांनी राग व्यक्त करताच अखेर महापौरांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली. महापौरांनी माफी मागण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने बहिष्कार घालत सभात्याग केला. परंतु महापौरांनी दिलगिरी व्यक्त करताच राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि भाजपाचा विरोध मावळला आणि सभेच्या कामकाजाला महापौरांनी सुरुवात केली.

…आणि महापौरांचा पारा चढला

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पावर शनिवारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या भाषण होणार होते. यासाठी सभागृह सकाळी ११.३० वाजता बोलावण्यात आले होते. परंतु सर्व सदस्य सभागृहात उपस्थित राहिल्यानंतर गणसंख्या पूर्ण झाल्यावर राजा यांनी सभागृह सुरू करण्याची मागणी केली. पण महापौर आणि उपमहापौर उपस्थित नसल्याने सभागृह सुरू झाले नाही. त्यानंतर दुपारी  अडीच वाजता महापौर उपस्थित राहिल्यावर कामकाजाला सुरुवात करण्यात आली. परंतु लेट लतीफ महापौरांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या विरोधी पक्षांसह भाजपाच्या नगरसेवकांनी समाचार घेतला. भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीही संतप्त सवाल करत उशीरा सभागृह सुरू करणाऱ्या महापौरांबाबत नाराजी व्यक्त केली. ‘तुमच्या वेळेची किंमत आहे, मग आमच्या या नगरसेवकांच्या वेळेची किंमत नाही का?’ असा सवाल राजा आणि कोटक यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अर्थसंकल्पाचे महत्व नसेल, तर तो मंजूर करून टाका, आम्ही चर्चा करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे महापौरांचा पारा चढला होता.

यावर सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी आम्ही विरोधी पक्षनेत्याला फोन करून तोपर्यत माजी महापौर मिलिंद वैद्य  पीठासीन अधिकारी म्हणून बसवून कामकाजाला सुरुवात करावी, तोपर्यत महापौर येतील, असे कळवले होते, असे सांगितले.

- Advertisement -

या सगळ्या प्रकारानंतर महापौरानी यापुढे सभागृह वेळेवर सुरू केले जाईल असे आश्वासन दिले आणि कामकाजाला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते यांच्या भाषणाच्या वेळी महापौर नाहीतर उपमहापौर उपस्थित राहावे, अशी प्रथा आहे. त्यामुळे अन्य कुणाला बसवून चर्चेला सुरुवात करणे योग्य नाही, असे रवी राजा यावेळी म्हणाले. जर महापौर आपत्कालीन कक्षाच्या कार्यक्रमाला महत्व देत असतील आणि अर्थसंकल्पाला महत्व देत नसतील तर याचा आम्ही निषेध करतो,  या चर्चेवर बहिष्कार घालत असल्याचं जाहीर करत त्यांनी यावेळी सदस्यांसह सभात्यागही केला. परंतु त्यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाचे नगरसेवक सभागृहात बसूनच राहिले. अखेर सभागृनेत्या विशाखा राऊत यांनी कोटक यांनी विनंती केल्यावर आणि महापौरांनी माफी मागितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी चर्चेत भाग घेतला.

भाजपाचा खेळी सफल

महापौर उशिराने आल्याने विरोधी पक्षाना भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी भडकवले. आम्ही आपल्यासोबत असल्याचे चित्र निर्माण करत त्यांना सभात्याग करायला भाग पाडले. त्यानुसार विरोधी पक्षनेत्यांनी सदस्यांसह सभात्याग केला. त्यामुळे त्यांना भाषण करता आले नाही. एकप्रकारे विरोधी पक्षनेत्यांना भाषण न करण्यापासून त्यांनी त्यांना परावृत्त केले आणि स्वतः सह सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्याना त्यांच्यासोबत जाऊ न देता त्यांच्यात फूट पडण्यात त्यांनी यश मिळवत आपली खेळी सफल केली. यापूर्वी अश्याच प्रकारे ज्ञानराज निकम, आणि बाळा आंबेरकर या विरोधी पक्षनेत्यांना  सत्ताधार्यांच्या खेळीमुळे भाषण अशाच प्रकारे करता आले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -