घरमुंबईमहापौर निधी जमवण्यात महाडेश्वर अपयशी

महापौर निधी जमवण्यात महाडेश्वर अपयशी

Subscribe

एखाद्या आपत्कालीन घटनेवेळी द्यायची मदत किंवा एखाद्या रुग्णाला ऑपरेशनसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता भासल्यास महापौर निधीतून मदत देण्याची पूर्वांपार पध्दत मुंबई महानगरपालिकेत आहे. त्यासाठी महापौरांकडून निधी जमवला जातो.

एखाद्या आपत्कालीन घटनेवेळी द्यायची मदत किंवा एखाद्या रुग्णाला ऑपरेशनसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता भासल्यास महापौर निधीतून मदत देण्याची पूर्वांपार पध्दत मुंबई महानगरपालिकेत आहे. त्यासाठी महापौरांकडून निधी जमवला जातो. मुंबईचे महापौरपद भूषवणार्‍या आजवरच्या महापौरांनी निधी जमवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निधी जमवण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नसल्याने त्यांच्या कार्यकाळात सर्वात कमी महापौर निधी जमा झाला आहे.

1956 साली महापौर निधीची सुरुवात करण्यात आली. वादळ, पूर, दुष्काळ, भूकंप, घरे कोसळणे व आगी लागणे यासारख्या आपत्तीमध्ये सापडणार्‍यांना या निधीमधून त्वरित मदत केली जाते. 20 सप्टेंबर 1990 रोजी हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंडरोपण, डायलेसिस, कर्करोग आणि इतर मोठ्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत देता यावी म्हणून या निधीच्या उद्दिष्टांमध्ये सुधारणा करण्यात आली. मुंबई महापालिकेकडे सध्या 2 कोटी 1 लाख रुपयांचा निधी पालिकेच्या बँकेत जमा आहे. हा निधी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात आला आहे. यामधून मिळणार्‍या व्याजातून गरीब व गरजू रुग्णांना ऑपरेशनसाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्यात येते. तसेच एखाद्या ठिकाणी आपत्कालीन घटना घडल्यास महापौर निधीमधून मदत केली जाते.

- Advertisement -

महापौर निधीमधून गरीब व गरजूंना मदत करता यावी म्हणून महापौर वेळोवेळी हा निधी कसा वाढेल यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र सध्याचे शिक्षकी पेशा असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निधी वाढवण्यासाठी आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. सन 2011 पासून श्रद्धा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर या महापौरांनी अद्याप ६६ लाख ४ हजार रुपयांचा महापौर निधी जमा केला आहे. मात्र गेल्या दीड वर्षात सध्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना या निधीमध्ये फक्त 3 लाख 20 हजार रुपयांची भर टाकता आलेली आहे. महाडेश्वर यांच्या कार्यकाळात सर्वात कमी महापौर निधी जमा झाला आहे.

महापौरांचा प्रतिक्रियेस नकार
तुमच्या कार्यकाळात महापौर निधी कमी झाल्याविषयी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात काही बोलण्यास नकार दिला.

- Advertisement -

काय आहे महापौर निधी
1956 साली महापौर निधीची सुरुवात करण्यात आली. वादळ, पूर, दुष्काळ, भूकंप, घरे कोसळणे व आगी लागणे यासारख्या आपत्तीमध्ये सापडणार्‍यांना या निधीमधून त्वरित मदत केली जाते. 20 सप्टेंबर 1990 रोजी हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंडरोपण, डायलेसिस, कर्करोग आणि इतर मोठ्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत देता यावी म्हणून या निधीच्या उद्दिष्टांमध्ये सुधारणा करण्यात आली.

हारफुलांच्या ऐवजी निधीसाठी आवाहन करावे
महापौरांनी निधी वाढवण्यासाठी लोकांना आवाहन करायला हवे. कार्यक्रमाला हार, पुष्पगुच्छ घेण्यापेक्षा महापौर निधीला मदत करा, असे आवाहन करायला हवे. त्यांना योग्य वाटत असल्यास एखादा कार्यक्रम आयोजित करावा. नगरसेवक व कर्मचार्‍यांना त्यांच्या मर्जीनुसार मदत करण्याचे आवाहन करावे
– स्नेहल आंबेकर, माजी महापौर

महापौर रजनी आयोजित करावी
महापौर रजनीचे किंवा आशा भोसले यांचा कार्यक्रम आयोजित करायला हवा. असा कार्यक्रम पालिकेच्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केल्यास आयोजनाचा खर्च जास्त होणार नाही.
– विशाखा राऊत, माजी महापौर व सभागृह नेत्या

ही गंभीर बाब
मुंबईमधील गरीब रुग्ण महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा बाळगून असतात. मात्र महापौर हा निधी जमवण्यात अपयशी ठरत असतील तर ही गंभीर बाब आहे. महापौरांनी निधी वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
– राखी जाधव, गटनेत्या राष्ट्रवादी काँग्रेस

यांनी जमवला जास्त निधी.
1995 ते 96 या कार्यकाळात रा. ता. कदम हे महापौर होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात महापौर रजनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातून महापौर निधीसाठी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. 2012 ते 2014 या कार्यकाळात सुनील प्रभू महापौर असताना त्यांनी नगरसेवकांना आपले मानधन देण्याचे तसेच पालिका कर्मचारी, अधिकारी यांचा एक दिवसाचा पगार महापौर निधीसाठी देण्याचे आवाहन केले होते. प्रभूंच्या कार्यकाळात 44 लाखांचा निधी जमवला होता.

 

दीड वर्षात फक्त 3 लाख 20 हजार ३44 रूपयांची भर

महापालिकेचे आर्थिक वर्ष जमा निधी

एप्रिल २०११ ते मार्च २०१२  ८,००,२३४
एप्रिल २०१२ ते मार्च २०१३  ३३,१५,४६४
एप्रिल २०१३ ते मार्च २०१४  १०,९०,३२७
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५  ५,६४,१४०
एप्रिल २०१५ ते मार्च २०१६  २,२८,२९३
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७  ६,०५,६९५
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८  ३,०८,२८२
एप्रिल २०१८ ते आतापर्यंत  १२,०६२
एकूण ६९,२४,४९७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -