घरमुंबईआदित्य ठाकरेंसाठी महापौरांनी मोडला प्रोटोकॉल!

आदित्य ठाकरेंसाठी महापौरांनी मोडला प्रोटोकॉल!

Subscribe

महापौरांनी आदित्य ठाकरेंसाठी मुंबई महानगर पालिकेत चक्क राजशिष्टाचार अर्थात प्रोटोकॉललाच मुरड घातल्याचं आज पाहायला मिळालं.

मुंबईच्या महापौरांसाठी स्वतंत्र राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) असतानाही केवळ शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपला राजशिष्टाचार झिडकारला. महापौरांनी आयुक्तांच्या दालना जाऊ नये, तर आयुक्तांना स्वत:च्या दालनात बोलावून घ्यावे, असा शिष्टाचार आहे. परंतु महापौरांना येण्यास विलंब झाल्यामुळे आदित्य ठाकरे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम हे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या दालनात गेले. त्यानंतर महापौर आपल्या दालनात आले. परंतु आदित्य आणि रामदास कदम आयुक्तांच्या दालनात गेल्याची माहिती मिळताच त्यांनीही थेट त्यांचे दालन गाठत राजशिष्टाचाराची एैशीतैशी करून टाकली.


हेही वाचा – अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक बीकेसीमध्ये?

मिठी नदीसंदर्भात होती बैठक

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची महापालिका मुख्यालयात आयुक्तांसोबत मिठी नदीच्या सुशोभिकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. संध्याकाळी चारच्या सुमारास ही बैठक असतानाच पावणे चारच्या सुमारासच ते दोघं मुख्यालयात आले. परंतु महापौर तिथे नसल्याने काही मिनिटे त्यांच्या दालनात बसल्यानंतर ते आयुक्तांना भेटण्यासाठी निघून गेले. त्यानंतर महापौरांचे आगमन झाले आणि त्यांनीही आपल्या कार्यालयात न जाता आयुक्तांच्या कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली आणि तिथेच बैठकीत सहभागी झाले. याची चर्चा दिवसभर पालिका मुख्यालयात सुरू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -