घरमुंबईरविवारी मध्य रेल्वे, हार्बरवर मेगा ब्लॉक

रविवारी मध्य रेल्वे, हार्बरवर मेगा ब्लॉक

Subscribe

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर येत्या रविवारी (१८ एप्रिल) मेगा ब्लॉक असणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवली जाईल. त्यानंतर लोकल गाड्या पुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.

ठाणे येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५५ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. यादरम्यान या सेवा नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर न थांबता पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर लाईन मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.०२ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करता पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करता गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.५८ वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. मात्र, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -