घरमुंबईउद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर असणार मेगाब्लॉक

उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर असणार मेगाब्लॉक

Subscribe

सीएसएमटी ते अंधेरी दरम्यान शनिवारी-रविवारी मध्य रात्री विशेष ब्लॉक घोषित

रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे तिन्ही मार्गांवर उद्या रेल्वेच्या कामाकरिता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल असे रेल्वेने घोषित केले आहे. तर हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकच्या वेळात असणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेने बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान ब्लॉकनिमित्त कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या विलंबाने असणार आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर उद्या सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉकअसल्याने या ब्लॉकमध्ये कल्याण वरून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर असणार आहे. याप्रमाणे ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत कल्याण दिशेकडे जाणाऱ्या लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

पश्चिम रेल्वेकडून माहीम धारावी रोड उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार असल्याने या कामासाठी सीएसएमटी ते अंधेरी दरम्यान २१ जुलै रोजी शनिवारी-रविवारी मध्य रात्री विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार असून, यादरम्यान धारावी रोड उड्डाणपुलाचे काम केले जाईल.

- Advertisement -

मध्य रेल्वे

स्थानक – मुलुंड ते माटुंगा
मार्ग – अप जलद
वेळ – सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६

हार्बर रेल्वे

स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे
मार्ग – अप आणि डाऊन
वेळ – सकाळी. ११.४० ते दुपारी. ४.१०

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली ते भाईंदर
मार्ग – अप आणि डाऊन धीमा
वेळ – सकाळी. ११ ते दुपारी.३

शनिवारी-रविवारी मध्य रात्री विशेष ब्लॉक

स्थानक – सीएसएमटी ते अंधेरी
मार्ग – अप आणि डाऊन
वेळ – रात्री १२ ते पहाटे ४ (शनिवार-रविवार मध्य रात्र)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -