घरCORONA UPDATECoronaEffect: या कारणांमुळे महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू दर जास्त

CoronaEffect: या कारणांमुळे महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू दर जास्त

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व वयोगटातील लोकांना होत असला तरी त्याच्या मृत्युची संख्या ही पुरुषांमध्ये जास्त असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून पाहायला मिळाले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व वयोगटातील लोकांना होत असला तरी त्याच्या मृत्युची संख्या ही पुरुषांमध्ये जास्त असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून पाहायला मिळाले आहे. मात्र असे का होते, या कारण शोधण्याचा सर्व संशोधक प्रयत्न करत आहेत. प्री-प्रिंटने केलेल्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरस हा महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळे दुष्परिणाम करत असल्याचे सांगितले जात आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास यांच्या ह्युस्टन मॅथोडिस्ट रिसर्च इंस्टिट्युट आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसी हेल्थ सायन्स सेंटर यांनी संयुक्तरित्या केलेल्या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळा होण्याकरता विविध बाबी जबाबदार ठरू शकतात. जसे स्त्री-पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टची जेनेटिक रचना आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठीच्या सवयी, ही कारणे सांगितली जात आहेत.

युरोपमधील १९ एप्रिलच्या साप्ताहिक पाहणी अहवालात WHO ने नमूद केले होते की, जगात कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ६३ टक्के पुरुषांचे प्रमाण आहे. कोविड-१९ वर देखरेख ठेवणाऱ्या समितीने बनवलेल्या मार्चमधील आणखी एका अहवालानुसार इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यामध्ये महिलांची संख्या फक्त २९.१ टक्के होती. त्यामुळे हे स्पष्ट होते की, पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण हे महिलांपेक्षा जास्त आहे.

- Advertisement -

ही असू शकतात कारणं

संशोधनाच्या आधारे, स्त्री आणि पुरुषांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिकार करणारे घटक वेगवेगळे असून शकतात. बहुतांश पुरूष हे धुम्रपानसारख्या व्यसनामुळे कार्डिओवॅस्कुलर सारख्या समस्येशी संबंधी आजारी जखडलेले असतात. हे एक प्रमुख कारण असू शकते. सौदी अरेबियात लोकांमध्ये मर्स (MERS) या आजारासंबंधीत केलेल्या संशोधनात असे आढळून आले होते की, खुपदा भटकंती करणे आणि विविधा लोकांच्या भेटीगाठी घेणे, हे त्यांच्या आजाराचे कारण बनू शकते. पुरुषांपेक्षा महिला सर्वाधिक प्रमाणात हात धुवण्याला पसंती देतात. हेदेखील कोरोना संसर्गाला रोखण्याचे प्रमुख कारण ठरू शकते.

हेही वाचा –

Lockdown: पत्नीकडून लूडोत हरला; संतापलेल्या पतीने पत्नीचा मणकाच मोडला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -