घरमुंबईअनु मलिकने माझ्याकडे १५ व्या वर्षी केली अश्लील मागणी - श्वेता पंडित

अनु मलिकने माझ्याकडे १५ व्या वर्षी केली अश्लील मागणी – श्वेता पंडित

Subscribe

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसापासून मीटू प्रकरण खूप गाजत आहे. याप्रकरणाता आता प्रसिध्द संगितकार अनु मलिक यांचे नाव देखील समोर आले आहे. प्रसिध्द पार्श्व गायिका श्वेता पंडितने त्यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे.

#MeToo प्रकरणाला दिवसेंदिवस नवे वळण येत आहे. प्रसिध्द संगीतकार अनु मलिक यांचे नाव देखील मिटू प्रकरणात समोर आले आहे. अनु मलिक यांच्यावर प्रसिध्द पार्श्व गायिका श्वेता पंडित हिने आरोप केले आहेत. १५ वर्षांची असताना अनु मलिक यांनी रेकॉर्डिंग स्टूडिओमध्ये छळ केल्याचा आरोप श्वेताने केला आहे. श्वेताने ट्विटरवरुन तिच्यावर आलेला प्रसंग शेअर केला आहे. त्यामुळे आता अनु मलिक यांचे देखील दाव मिटू प्रकरणाच्या यादीत आले आहे.

- Advertisement -

गाणं देतो पण तुला किस करावे लागेल

तिने या ट्विटर पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘२००० साली लॉन्च झाली होती. मला अनु मिलकचे त्यावेळी असणारे मॅनेजर मुस्तफा यांचा फोन आला होता. मला अंधेरीच्या एम्पायर स्टूडिओमध्ये बोलवण्यात आले. जेव्हा मी आणि माझी आई स्टूडिओमध्ये पोहचलो तेव्हा ते ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटासाठी शान आणि सुनिधी यांच्यासोबत गाणं रेकॉर्ड करत होते. त्यांनी मला म्युजिकशिवाय गाणे गायला सांगितले. तेव्हा मी ‘हर दिल जो प्यार करेगा’ हे गाण गायले. तेव्हा अनु मलिक यांनी मला सांगितले की, मी तुला हे गाणं सुनिधी आणि शान यांच्यासोबत गायला देईल. मात्र यासाठी तुला मला आता किस द्यावे लागेल. तेव्हा मला मोठा धक्का बसला.’

भावाच्या मुलीकडे अशी मागणी करेल का?

श्वेताने पुढे असे म्हटले आहे की, तेव्हा मी १५ वर्षाची होती आणि शाळेत जात होती. तेव्हा मी त्यांना अनू अंकल बोलायचे. ते माझ्या कुटुंबियांना दशकापासून ओळखत होते. ते माझ्या वडीलांना भाई बोलायचे. काय कोणी आपल्या भावाच्या मुलीकडे अशी मागणी करेल का? अनु मलिक यांना दोन तरुण मुली आहेत. तो क्षण माझ्या जीवनाचा सर्वात वाईट क्षण होता. या घटनेमुळे मी अनेक महिने तणावात होते.

- Advertisement -

गायिकांनी पुढे येऊन प्रसंग शेअर करावा

श्वेताने अनु मलिक यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. मला खात्री आहे की, अनु मलिक यांनी अनेक गायिकांचे शोषण केले असेल. मी त्या गायिकांना अपील करते की, ते सुध्दा अनु मलिकच्याविरोधात आपला प्रसंग शेअर करावा. तसंच श्वेताने गायिका सोना महापात्राचे अनु मलिक यांचे वर्तन समोर आण्यासाठी आभार मानले आहे. सोना महापात्राने अनु मलिकवर सतत आरोप केले आहेत. .

सोनाला कधीच भेटलो नाही

दरम्यान सोना महापात्राच्या आरोपांचे अनु मलिक यांना खंडण केले आहे. मी कधी सोना महापात्रासोबत काम केले नाही. आतापर्यंत आम्ही कधीच भेटलो नाही. याप्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. ते फक्त माझ्या नावाची बदनामी करत आहे. मी यावर काहीच टिप्पणी करु इच्छिच नसल्याचे अनु मलिक यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -