घरमुंबईमुंबईकरांसाठी म्हाडाची 'मेगा' लॉटरी; गिरणी कामगारांसाठी खुशखबर 

मुंबईकरांसाठी म्हाडाची ‘मेगा’ लॉटरी; गिरणी कामगारांसाठी खुशखबर 

Subscribe

येत्या काळात लवकरच मुंबईकरांसाठी म्हाडाची 'मेगा' लॉटरी लवकरच काढली जाईल मात्र त्याकरता आणखी वाट पाहावी लागणार आहे. तर गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत ३ हजार ८०० घरांची लॉटरी प्रक्रिया ही येत्या जुलै अखेरीस सुरू होणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील २१७ सदनिकांच्या संगणकिय सोडतीकरीता ६६ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले होते. आजच्या सोडतीमध्ये राशी कांबळे या पहिल्या विजेत्या ठरल्या. त्या चेंबूर सहकार नगर येथे अनुसुचित जाती प्रवर्गात विजेता ठरल्या. जगभरातील २६ देशांमधून १७ हजार ८४५ नेटकरांनी लॉटरीचे वेबकास्टिंग पाहिले हे विशेष. म्हाडाच्या एका घरासाठी ३०० अर्जदार ही स्थिती आजच्या लॉटरीसाठी होतीतसेच येत्या काळात मुंबईकरांसाठी म्हाडाची मेगालॉटरी लवकरच काढली जाईल मात्र त्याकरता आणखी वाट पाहावी लागणार आहे. तर गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत ३ हजार ८०० घरांची लॉटरी प्रक्रिया ही येत्या जुलै अखेरीस सुरू होणार आहे.

म्हाडाकडे उपलब्ध होणाऱ्या हाऊसिंग स्टॉकचे सर्वेक्षण येत्या आठवड्याभरात पुर्ण करण्यासाठी म्हाडा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी नेमकी किती घर उपलब्ध होतील याचा अंदाज येईल. म्हाडाने अवलंबलेल्या नव्या धोरणामुळे म्हाडाला हाऊसिंग स्टॉक नव्या प्रकल्पातून मर्यादित स्वरूपाचाच उपलब्ध होणार आहे. त्यातुलनेत प्रिमिअम भरण्यासाठी विकासकांचा प्रयत्न आहे. म्हणूनच आधीच्या प्रकल्पातील हाऊसिंग स्टॉकची उपलब्धतता पडताळूनच लॉटरीची घोषणा विधानसभेपूर्वी करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. ज्या घरकुल प्रकल्पांना सहा महिन्यांनी ओसी मिळणार आहे अशा प्रकल्पांची गणनाही हाऊसिंग स्टॉकमध्ये करण्याचा आमचा विचार आहे. संपुर्ण प्रक्रियेत सहा महिन्यांचा कालावधी समाविष्ठ असल्यानेच ही घरे आम्ही विचाराधीन ठेवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

गिरणी कामगारांसाठी सोडत 

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे म्हाडामार्फत ३ हजार ८०० घरांची लॉटरी प्रक्रिया ही येत्या जुलै अखेरीस सुरू होणार आहे. तर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. दोन मिलच्या जागांच्या ठिकाणी ही घरे उपलब्ध झाल्याने गिरणी कामगारांना घर देण्यासाठीचा हा एक महत्वाचा टप्पा असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत म्हणाले.

म्हाडाला श्रीनिवास मिलच्या जागेवरील ४८५ घरे तर बॉम्बे डाईंग मिलच्या जागेवर ३ हजार ३४० घरे उपलब्ध झाली आहेत. या घरांसाठी लॉटरी प्रक्रिया ही जुलैमध्ये सुरू होईल. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. तर कोकण मंडळाअंतर्गतही आणखी २ हजार ते २ हजार ५०० घरांसाठी लॉटरी येत्या दिवसात अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

मुंबई मंडळातर्फे ६ मार्च रोजी २१७ सदनिका विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटाकरिता सहकार नगर, चेंबूर येथील १७० सदनिका आणि मध्यम उत्पन्न गटाकरिता ४७ सदनिकांचा समावेश होता. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक२०१९ च्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

मी म्हाडामध्ये पणन विभागात कार्यरत आहे. पण यंदा मी घरासाठी पहिल्यांदाच अर्ज हा सर्वसाधारण प्रवर्गातून केला होता. पहिल्यांदाच अर्ज करून विजेता ठरल्याने मी अतिशय आनंदी आहेगणेश खैरनार, विजेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -