घरमुंबईआता रेरा नोंदणीकृत किंवा ओसी मिळालेल्या घरांचाच म्हाडा सोडतीत समावेश

आता रेरा नोंदणीकृत किंवा ओसी मिळालेल्या घरांचाच म्हाडा सोडतीत समावेश

Subscribe

म्हाडाची लॉटरी लागल्यानंतर सदनिकाधारकांना यापुढे तात्काळ सदनिका ताब्यात मिळणार आहे. यापुढे रेरा नोंदणीकृत अथवा भोगवाटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त सदनिकांचाच म्हाडाच्या लॅटरीत समावेश करण्यात येणार आहे.

म्हाडाची लॉटरी लागल्यानंतर सदनिकाधारकांना यापुढे तात्काळ सदनिका ताब्यात मिळणार आहे. यापुढे रेरा नोंदणीकृत अथवा भोगवाटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त सदनिकांचाच म्हाडाच्या लॅटरीत समावेश करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलेल्या निर्देशाला म्हाडाने मंजुरी दिली आहे. यापुढे २०१८ च्या म्हाडा सदनिकांच्या सोडतीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विधानसभा सदस्य अॅड. निरंजन डावखरे यांनी मुंबईत म्हाडाच्या वतीने काढण्यात आलेल्या सोडतीतील अर्जदारांना घराचा ताबा देताना होणार्‍या विलंबाबाबत विधानपरिषदेत तारांकीत प्रश्‍न उपस्थित केला होता. यासंबंधी चर्चा करण्याचे आदेश राज्यमंत्री वायकर यांनी गृहनिर्माण विभागाला दिले होते.

राज्यमंत्र्यांनी नोंदवले मत 

२७ जून २०१८ रोजी राज्यमंत्री यांच्या दालनात याप्रश्‍नी चर्चा करण्यात आली. या बैठकीला विभागातील अधिकार्‍यांसमवेत म्हाडाच्या मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पणन) हे देखील उपस्थित होते. या बैठकीला ओसी प्राप्त झालेले नसतानाही सदनिकांच्या सोडतीमध्ये समावेश करण्याबाबत आक्षेप नोंदवला. म्हाडाकडून सोडत काढल्यानंतरही काही वर्ष निव्वळ ओसी न मिळाल्यामुळे यशस्वी अर्जदारांना सदनिकांचा ताबा न मिळणे हे योग्य नाही, असेही मत राज्यमंत्री वायकर यांनी नोंदवले होते.

- Advertisement -

२०१८ च्या म्हाडाच्या सोडतीत नियम लागू 

गृहनिर्माणच्या २३ मे २०१८ च्या अधिसूचनेनुसार म्हाडा अभिन्यासातील इमारतीकरीता नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाला घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे ओसी मिळण्यासाठी पूर्वीसारखी वाट पाहावी लागणार नाही, असे मत वायकर नोंदवले आहे. त्यानुसार रेरा नोंदणीकृत अथवा भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त सदनिकांचा, आगामी सोडतीमध्ये समावेश करण्यात यावा, या गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वायकर यांच्या आदेशाला म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी मंजूरी दिली आहे. २०१८ च्या म्हाडाच्या सोडतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री वायकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -