घरमहाराष्ट्रराज्यातील सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांना बंदी - हिंदु जनजागृती समिती

राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांना बंदी – हिंदु जनजागृती समिती

Subscribe

राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून आल्यास प्रवेशबंदी करावी अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. शाळा-महाविद्यालये, पोलीस खाते या ठिकाणी ड्रेस कोड घालता मग मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्यास बंदी घातल्यास विरोध का करता असा सवाल देखील समितीने उपस्थित केला आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीचा हा प्रयत्न स्तुत्य असून असा नियम राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

तिरुपती येथील मंदिरांसह देशातील अनेक मंदिरांत तोकड्या कपड्यांत महिला आणि पुरुष भाविकांना देवाचे दर्शन दिले जात नाही. काही मंदिरांत स्थानिक प्रथा-परंपरेनुसार पोषाखाचे नियम असतात. तसेच गाभार्‍यात जाऊन दर्शन घ्यायचे असेल, तर सोवळ्यात जावे लागते. त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशी आमची भूमिका असल्याचे देखील या समितीने सांगितले आहे.

- Advertisement -

मंदिरांने असे नियम केल्यास विरोध का?

अनेक आस्थापने, कार्यालये येथे महिला आणि पुरुष यांच्यासाठीचा विशिष्ट पोषाख (ड्रेस कोड) ठरवून दिलेला असतो. शाळा-महाविद्यालये, पोलीस खाते, रुग्णालये आदी ठिकाणी गणवेश असतो. तेथे सर्व नियम पाळले जातात, मग मंदिरांनी असे नियम केल्यास ते पाळण्यासाठी विरोध का केला जात आहे? केवळ पुरोगामी लोकांकडून धर्माशी संबंधित विषय असल्यानेच हा विरोध केला जात आहे. मंदिरात काय असावे? काय असू नये? हे पुरोगाम्यांनी नव्हे, तर धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने ठरवायला हवे.

अपप्रचाराला न भुलता धर्मपालन करावे

मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत आहेत. तेथील शक्ती, चैतन्य, सात्त्विकता, ऊर्जा ही भाविकांनी मनोभावे पूजा केल्याने तर मिळतेच. पण सात्त्विक वस्त्र परिधान केल्यास ती अधिक प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो. असे अध्यात्मशास्त्र सांगते. भाविकांनी पुरोगाम्यांच्या अपप्रचाराला न भुलता धर्मपालन करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -