घरमुंबईMIDC ची जलवाहिनी पुन्हा फुटली; दिवाळीत ठाण्याचा पाणीपुरवठा काही तासांसाठी बंद

MIDC ची जलवाहिनी पुन्हा फुटली; दिवाळीत ठाण्याचा पाणीपुरवठा काही तासांसाठी बंद

Subscribe

मुंब्रा, शीळफाटा येथील चिंतामणी हॉटेल्स जवळ एमआयडीसीची जल वाहिनी फुटल्याने आजूबाजूच्या झोपडपट्टी भागात पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास दहा रहिवाशांना अग्निशमन दलाच्या मदतीने यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. या फुटलेल्या जलवाहिनीमुळे ठाणे शहर परिसराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, काम पूर्ण झाल्यानंतर साधारण ८ तासांत तो पुन्हा सुरू असा विश्वास वर्तविण्यात आला आहे. सातत्याने जलवाहिनी फुटत असल्याने पाणी टंचाई दिवाळीतही सुरूच असल्याचे दिसत आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याचे समोर आले. फुटलेल्या जलवाहिनीचे सुमारे ६ इंच नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने धाव घेतली आहे. झोपडपट्टी भागात पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने मदत कार्य सुरू केले. जवळपास दहा रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी यशस्वीरित्या बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, कोणतीही दुखापत झालेली नाही. तर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हे काम पूर्ण झाल्यानंतर ८ तासांनी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल अशी शक्यता आपत्ती विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -