घरमुंबईपोलिसांची वृद्धेला मध्यरात्री दादागिरी

पोलिसांची वृद्धेला मध्यरात्री दादागिरी

Subscribe

वसईत आज मेणबत्ती मोर्चा

वसई:-सोसायटीतील पदाधिकार्‍यांच्या सांगण्यावरून एका 78 वर्षीय वृद्धेला मध्यरात्री बळजबरीने पोलीस ठाण्यात नेणार्‍या पोलिसांच्या दादागिरी विरोधात सोमवारी सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे.‘मी वसईकर’ अभियानने या मोर्चाचे आयोजन केले आहे.

27 सप्टेंबरच्या मध्यरात्री वसंतनगरीत राहणार्‍या 78 वर्षीय फिलोमीना फर्नांडिस यांच्या घरात तुळींज ठाण्याचे पोलीस शिरले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सोसायटीतील काही पदाधिकारीही होते. त्यांनी दादागिरी करत फिलोमीनांंचा बेडरुम गाठला. त्यानंतर बळजबरीने त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मध्यरात्री पोलीस आणि सोसायटीतील माणसे घरात शिरल्यामुळे त्या भयभीत झाल्या होत्या. वृद्धावस्थेमुळे त्या अगोदरपासूनच आजारी आहेत. या प्रकाराचा त्यांना धक्का बसला. त्यानंतर तासाभराने दमदाटी आणि विचारपूस करून त्यांना सोडून देण्यात आले.

- Advertisement -

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ‘मी वसईकर’ अभियानाच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकाराची तक्रार केली. त्यावेळी 10 दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.या आश्वासनाला पंधरा दिवस होत आले असतानाही पोलिसांच्या दादागिरीविरोधात वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता वसंतनगरी येथून एस.पी.कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -