घरक्रीडापृथ्वी म्हणजे सचिन, सेहवाग, लाराचे मिश्रण - रवी शास्त्री

पृथ्वी म्हणजे सचिन, सेहवाग, लाराचे मिश्रण – रवी शास्त्री

Subscribe

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतासाठी पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉला मालिकावीराचा खिताब मिळाला. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याची प्रशंसा केली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. राजकोट येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पदार्पणाच्या डावातच त्याने शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात आक्रमक ७० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३३ धावा करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या त्याच्या अप्रतिम कामगिरीची प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रशंसा केली आहे.

पृथ्वीचा जन्म क्रिकेट खेळायसाठीच झाला 

शास्त्री पृथ्वीबाबत म्हणाले, “पृथ्वीचा जन्म क्रिकेट खेळण्यासाठीच झाला आहे. तो अवघा ८ वर्षांचा असल्यापासून मुंबईच्या वेगवेगळ्या ‘मैदानांत’ क्रिकेटचे धडे गिरवतो आहे. त्याने इथवर यायला खूप मेहनत घेतली आहे. आता ती मेहनत दिसते आहे. त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळते आहे. त्याच्यात थोडा सचिन, थोडा सेहवाग आहे. पण तो ज्याप्रकारे चालतो त्यामध्ये थोडा ब्रायन लाराही आहे. जर तो मेहनत करत राहिला तर त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.”

राहुल लवकरच फॉर्मात येईल 

लोकेश राहुलला विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन करता आले नाही. पण प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राहुल लवकरच फॉर्मात येईल असा विश्वास दाखवला आहे. ते म्हणाले, “राहुल हा अप्रतिम खेळाडू आहे. कधीकधी तो जरा जास्त प्रयत्न करतो. पण तो त्याच्या फलंदाजीवर खूप मेहनत घेत आहे. त्यामुळे तो राहुल लवकरच फॉर्मात येईल याची मला खात्री आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -